शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या १० कोटी रूपयांचा घोळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 21:01 IST

प्रत्येक ग्रामपंचायतीचा काही निधी बँकेत ठेवला होता. त्या त्या संबंधित बँकांनी हा निधी परत देण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देसर्व ग्रामपंचायतींचा मिळून १० कोटी रूपयांचा निधी

पुणे : न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या एकत्रित अशा १० कोटी रूपयांचा घोळ सुरू आहे. या गावांचे १० कोटी रूपये विविध बँकामध्ये ठेव स्वरूपात असून ते परत देण्यास या बँकांनी महापालिकेला नकार दिला आहे. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक वसंत मोरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.महापालिका हद्दीत समावेश झाल्यामुळे या सर्व ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेकडून त्यांचे दप्तर महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीचा काही निधी होता.तो त्यांनी बँकेत ठेवला होता. त्या त्या संबंधित बँकांनी हा निधी परत देण्यास नकार दिला आहे. यातील काही बँका खासगी व काही राष्ट्रीयकृत आहेत.मोरे म्हणाले, आंबेगाव खुर्द या गावाचे उदाहरण दिले. तेथील ग्रामपंचायतीचे ५६ लाख व २३ लाख रूपये दोन वेगवेगळ्या मध्ये आहेत. महापालिका प्रशासनाने या बँकांना ग्रामपंचायतीची ठेव मागितली असता बँकांनी ती परत करण्यास नकार दिला. महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनीही त्याला दुजोरा दिला. सर्व ग्रामपंचायतींचा मिळून १० कोटी रूपयांचा निधी आहे. त्याची मागणी करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत बँकांना अनेक पत्रे दिली आहेत, मात्र, त्यांच्याकडून नकारच मिळत आहे असे कळसकर यांनी सभागृहाला सांगितले.महापौर मुक्ता टिळक यांनी याबद्धल आश्चर्य व्यक्त केले. मोरे यांनी बँकांना ठेवी हव्या असतात. या ठेवी मोठ्या रक्कमेच्या आहेत. त्यामुळे बँकां त्या सोडवत नसाव्यात, आर्थिक वर्ष अखेर असल्यामुळेही त्यांच्याकडून ठेव परत द्यायला नकार मिळत असावा. मात्र,महापालिकेला या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी निधी हवा असल्याने प्रशासनाने हा निधी त्वरित मिळवावा, अशी मागणी त्यांनी केली. महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार यांनी बँक अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी व हा विषय लवकरात लवकर निकाली काढावा असा आदेश दिला.  

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकkunal kumarकुणाल कुमार