शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात क्रिकेट,फुटबॉलसह मैदानी खेळांना महापालिकेची परवानगी; 'या' नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 12:19 IST

व्यायामशाळा (जीम) उघडण्यास महापालिकेने मान्यता दिलेली नाही...

ठळक मुद्देसुरक्षित अंतर ठेऊन खेळता येणाऱ्या क्रीडाप्रकारांना महापालिकेची परवानगी 

पुणे : क्रिकेट, खो-खो, फुटबॉल इत्यादी मैदानी खेळांसह, ज्या खेळांमध्ये सुरक्षित अंतर राखून खेळता येणारे इनडोअर क्रीडा प्रकार म्हणजेच बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारांना महापालिकेने मंगळवारी परवानगी दिली. यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील खेळांना परवानगी देण्याची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, अद्यापही व्यायामशाळा (जीम) उघडण्यास महापालिकेने मान्यता दिलेली नाही.      पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. यात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊनच सर्व खेळ खेळण्यात यावे असे नमूद केले आहे. क्रिकेट, खो-,खो सारख्या खेळांचे आयोजन करणाऱ्या आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. सरावाकरिता आवश्यक तेवढ्याच व मर्यादित खेळाडूंनाच प्रवेश देण्यात यावा. सर्वांनी मास्कचा वापर करावा़ १० वर्षाआतील मुलांना व ६५ वर्षांवरील व्यक्तींना सदर ठिकाणी प्रवेश देऊ नये. खेळाडू, कर्मचारी सर्वांची प्रवेशव्दाराजवळ थर्मल स्क्रीनिंगव्दारे तपासणी करावी.     इनडोअर हॉलमध्ये खेळांचा सराव करताना दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए़सी़चा वापर टाळावा़ हॉलचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे़ मैदानाच्या प्रवेशव्दाराजवळ व इनडोअर हॉलच्या ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे़ तसेच खेळांचे आयोजनासाठी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात यावी व कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज, फेसशिल्ड आदी सुरक्षा साधने द्यावीत, असेही महापालिकेने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे़     ----------लक्षणे असलेल्या खेळाडूंना मान्यता नाही ताप, सर्दी, खोकला यासारखी कोविड-१९ ची लक्षणे असलेल्या खेळाडूंना कुठल्याही खेळासाठी परवानगी देऊ नये़ असे आदेश महापालिकेने खेळांचे आयोजन करणाऱ्या आस्थापनांना म्हणजेच क्रीडांगणे व क्रीडा संस्थांना दिले आहेत़ तसेच ज्या खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे, त्यांची सखोल माहिती कॉटॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने सदर आस्थापनांनी ठेवावी़ व कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तथा क्रीडा विभागाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही महापालिकेने सांगितले आहे. -------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या