शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

महापालिका अंदाजपत्रक : सत्ताधाºयांकडून स्वागत; विरोधकांकडून वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 04:09 IST

उत्पन्नाचा अंदाज घेत कोणताही फुगवटा न आणता शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद असलेले अत्यंत वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगत सत्ताधारी सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. तर उत्पन्न आणि खर्चाचा कोणताही ताळमेळ नसलेले, आत्मविश्वास हरवलेले

पुणे - उत्पन्नाचा अंदाज घेत कोणताही फुगवटा न आणता शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांसाठी भरीव तरतूद असलेले अत्यंत वास्तववादी अंदाजपत्रक सादर केल्याचे सांगत सत्ताधारी सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. तर उत्पन्न आणि खर्चाचा कोणताही ताळमेळ नसलेले, आत्मविश्वास हरवलेले, फसवे व दिशाहीन अंदाजपत्रक असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे वाभाडे काढले.महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू झाली तेव्हा सभागृहात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सदस्य उपस्थित होते. तसेच स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनादेखील थोडा उशीर झाला. यामुळे अध्यक्ष आल्याशिवाय अंदाजपत्रकावर चर्चा सुरु करू नये अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. मोहोळ आल्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रथम काँगे्रसचे आबा बागुल यांनी सुरुवात करत प्रशासन आणि स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर आक्षेप घेतला. कायद्यानुसार अंदाजपत्रकामध्ये सुरुवातीची रक्कम (ओपनिंग बॅलन्स) दाखविणे बंधनकारक असताना स्थायी समितीच्या अंदाजपत्रकामध्ये तो दाखविला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. बागुल यांनी प्रामुख्याने जमेच्या बाजूवरच अधिक चर्चा केली. तर राजेश येनपुरे, अदित्य माळवे यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक पुणेकरांच्या आश्वासनांची पूर्तता करणारे असून, मूलभूत गरजांसाठी भरघोस तरतूद असलेले अंदाजपत्रक असल्याचे सांगितले. पदाधिकारी, सदस्य पुणेकरांचा विचार करून योजना तयार करतात, पण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुढे जात नसल्याचे सांगितले. अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी, या वेळीदेखील विरोधकांना डावलण्यात आले असून, खूपच तुटपुंजे बजेट दिल्याचे सांगितले.सायली वांजळे यांनी महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी आरसीबी व डीटीआरकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. दीपक मानकर यांनी शिवसृष्टीसाठी तरतूद केल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले, परंतु ही तरतूद खूपच कमी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.बालगंधर्व जमीनदोस्त करण्यास विरोधमहापालिकेच्या सन २०१८-१९च्या अंदाजपत्रकामध्ये बालगंधर्व रंगमंदिर नव्याने उभारण्यात येणार असून, यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु बालगंधर्व रंगमंदिर शहराच्या वैभावात भर पाडणारी वास्तू असून, ती पाडण्यास आमचा विरोध असल्याचे दीपक मानकर यांनी सांगितले. बालगंधर्व येथे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून, येथे समांतर अशी दुसरी इमारत उभारावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.सुभाष जगताप यांनी अंदाजपत्रकावर चर्चा करत चांगलाच समाचार घेतला. सत्ताधाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दर वर्षी करामध्ये वाढ करावी लागणार आहे. ११ गावे समाविष्ट झाल्याने शहराच्या हद्दीत ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यामुळे शासनाकडे अधिकच्या जीएसटीची मागणी करायला पाहिजे. परंतु सत्ताधारी आत्मविश्वास हरवून बसेल आहेत. यामुळे राज्य व केंद्र शासनाकडूनदेखील अपेक्षित निधी पुण्याला मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBudgetअर्थसंकल्प