शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुंढवा-मगरपट्टा पोटनिवडणूक होणारच; भाजपा-राष्ट्रवादीत लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 03:07 IST

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टामधील प्रभाग क्रमांक २२ क ही रिक्त जागा राष्ट्रवादीच्या पदरात अविरोध पडण्याची शक्यता मावळली आहे.

पुणे : माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या मुंढवा-मगरपट्टामधील प्रभाग क्रमांक २२ क ही रिक्त जागा राष्ट्रवादीच्या पदरात अविरोध पडण्याची शक्यता मावळली आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमतात असलेल्या भारतीय जनता पार्टीने ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादीला त्यामुळे आपली जागा कायम ठेवण्यासाठी झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा गेली अनेक वर्षे आहे. चंचला कोंद्रेच तिथे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याच घरात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ती मुलीकडे द्यायची की सुनेकडे याचा निर्णय पक्षाने त्यांच्या कुटुंबीयांवर सोपवला आहे.अद्याप यासंदर्भात काहीहीठरले नाही असे पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.भाजपाने मात्र यात आघाडी घेतली असून कोद्रे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुकन्या गायकवाड यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पक्षाचा अधिकृत अर्ज सोमवारीच देण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली.घोरपडी येथील पक्षाचे उमेदवार दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत कोणीही उमेदवार देऊ नये असे आवाहन पक्षाने केले होते, मात्र त्याला राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळेच या वेळी पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.कॉँग्रेस, शिवसेनेकडून अद्याप हालचाल नाही1 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस आहे. मनसेने या जागेवर उमेदवारन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसनेअद्याप उमेदवार जाहीरकेला नसला तरी राष्ट्रवादीबरोबर आघाडी म्हणून तेही इथे उमेदवारी देण्याची शक्यता नाही.2शिवसेनेने अद्याप काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यात होणार असे दिसते आहे. मंगळवारी दुपारीतीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर २१ मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. ६ एप्रिलला मतदान होणार आहे.

टॅग्स :Puneपुणे