शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

द्रुतगती मार्गावर अत्याधुनिक यंत्रणांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कवच मिळणार आहे.

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कवच मिळणार आहे. महामार्ग वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेच्या (एचटीएमएस) माध्यमातून मार्गावरील प्रत्येक वाहनावर नजर ठेवली जाणार आहे. बेशिस्त वाहनांवर नियंत्रणासह अपघात रोखणे, वाहनचालकांना मार्गावरील प्रत्येक महत्वाच्या घटनांबाबत अवगत करणे आदी बाबींसाठी उच्च क्षमतेची यंत्रणा उभारली जाणार आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी व आयटी हब असलेल्या पुणे शहराला जोडणारा हा ९४ किलोमीटर लांबीचा मार्ग वाहनचालकांसाठी पर्वणी आहे.

देशातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी हा मार्ग आहे. दररोज सुमारे ६० हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे वाहतुक कोंडी, अपघाताच्या घटना घडत आहेत. पहिल्या दहा वर्षात सुमारे १८०० अपघातांमध्ये ४०० जणांना प्राण गमवावे लागले. अतिवेग, क्षमतेपेक्षा जास्त सामानाची वाहतूक, अनधिकृत थांबे, लेन कटिंग ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. यापार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.वेग नियंत्रण यंत्रणा, लेन शिस्तभंग नियंत्रण यंत्रणा, ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण, हवामान निरीक्षण यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग यंत्रणा, उच्च क्षमतेचे कॅमेरे, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, अ‍ॅप अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक वाहनावर नजर ठेवली जाणार आहे.अनधिकृत थांबे, घटनांची माहिती व व्यवस्थापन, वाहनांचा शोध, सीटबेल्ट नियमभंग, मार्गात अडथळे या बाबींवर विशेष लक्ष राहील. एक्सप्रेसवेची सुरूवात व शेवट, फुड प्लाझा, टोल प्लाझा या ठिकाणांसह मार्गाच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी वाहनांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असेल. वाहनचालकांच्या माहितीसाठी संपूर्ण मार्गावर विविध डिजिटल फलक, माहिती फलक लावण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनचालकांच्या माहितीसाठी मशीन (किआॅक्स) ठेवण्यात येणार आहेत. पुढील काही महिन्यांत या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.>अशी असेल प्रस्तावित यंत्रणाउच्च क्षमतेचे कॅमेरे - ४३वेग नियंत्रण यंत्रणा - २७लेन शिस्तभंग यंत्रणा - २८डोम कॅमेरा - ७ओव्हरलोड नियंत्रण सेन्सर - ६आधुनिक संदेश यंत्रणा - २३हवामान देखरेख यंत्रणा - ११