शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Kasba By Election: मतदान करताना मुक्ता टिळक बरोबर नसल्याने त्यांची आठवण येते; शैलेश टिळकांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 13:54 IST

पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच भाजपचा विजय निश्चित होता.

पुणे: विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याच्या कारणावरून नाराजीची चर्चा सुरु  होती. पण कुटुंबीयांनी आम्ही नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. व त्यानंतर ते प्रचारात सहभागी झाले होते. आजही टिळक कुटुंबीयांनी आनंदाने मतदान केले आहे. पण यावेळी मतदान करताना मुक्ता टिळक बरोबर नसल्याने त्यांची आठवण येत असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले आहे. 

आज शैलेश टिळक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले. त्यानंतर लोकमतशी संवाद साधला. शैलेश टिळक म्हणाले, आज मुक्ता टिळक आमच्याबरोबर नाहीत. त्याच दुःख होतंय. प्रत्येक निवडणुकीला आम्ही एकत्र येतो. त्यामुळे त्यांची आठवण येणे स्वाभाविकच आहे. आताचे वातावरण खूप चांगले आहे. पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हाच भाजपचा विजय निश्चित होता. आम्हाला खात्री आहे की, रासने प्रचंड बहुमताने विजयी होतील. 

आम्ही स्वतः दारोदारी या प्रचारात फिरलो 

भाजपचा कुठलाही नेता, कार्यकर्ता देशासाठी ड्युटी म्हणून ग्राउंड लेव्हलवर येऊन काम करतो. कुठलीही निवडणूक भाजप हलख्यात घेत नाही. आमच्या पक्षाचे नियोजन हे उत्तम असते. मागच्या ८ वर्षात भाजपमुळे परिवर्तन झाले आहे. आमची नाराजी कधीच दूर झाली होती. ब्राह्मण समाजाने आणि पक्षातील सर्वांनी रासने यांना पाठिंबा दिला. आम्ही स्वतः दारोदारी या प्रचारात फिरलो असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले आहे.  

निकालाची राज्यालाही उत्सुकता 

२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारणVotingमतदानMukta Tilakमुक्ता टिळक