शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यात महावितरणच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:04 IST

कोंढवा-मिठानगर प्रभाग क्रमांक २७ या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोषित लोडशेडींग होत आहे. त्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

ठळक मुद्देमहावितरणला मनसेच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत निषेध व्यक्त केला.

पुणे : सतत होणार्‍या भारनियमनाच्या निषेधार्थ मंगळवारी कोंढव्यातील महावितरणच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कोंढवा-मिठानगर प्रभाग क्रमांक २७ या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अघोषित लोडशेडींग होत आहे. याबाबत सूचना दिली जात नसल्याने त्यामुळे प्रभागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . याबाबत महावितरणला मनसेच्या वतीने अनेकदा निवेदन देण्यात आली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही. नागरिकांचे फोन न उचलणे, उचलला तर येतो १५ मिनिटात असे सांगून २ तास नागरिकांना वेठीस धरणे, नवीन लाईट मीटर घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जादा  पैसे न दिलेल्यांना कागदपत्रांतील त्रुटी काढून चकरा मारावयास लावणे, लाईट बील वेळेवर येत नाही, अशा तक्रारी करण्यात येत होत्या, असे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी सांगितले. 

आज दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत निषेध व्यक्त केला. कार्यालयाची तोडफोड केली. काचा फोडल्या, खुर्च्यांची मोडतोड केली. चार दिवसांत मागण्या मान्य करण्यात येतील, असे पत्र मनसे कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांकडून घेतले. 

टॅग्स :agitationआंदोलनMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPuneपुणे