शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीने वेळापत्रक जाहीर करावे; राज्य सरकारने मागणीपत्र पाठविले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:46 IST

MPSC Exam : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने यंदाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने यंदाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर्षी परीक्षा होणार आहेत की नाहीत, या प्रश्नावरून विद्यार्थी चिंतेत आहेत. सर्वसाधारणपणे एमपीएससीने २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबरमध्येच जाहीर करणे अपेक्षित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने राज्य पूर्व परीक्षा तब्बल पाच वेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच. मात्र, यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत, हे स्पष्ट केले नाही. २१ मार्चला परीक्षा घेऊन कोरोनासारख्या संकटातदेखील चांगल्या प्रकारे परीक्षा घेता येते, हे एमपीएससीने दाखून दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता फार काळ विचार न करता संबंधित विभागाच्या रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर होऊन अभ्यास करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.काय आहेत समस्या?  कोरोना आणि आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षांत भरतीप्रक्रिया रखडली. वय वाढल्याने संधी हुकली. वय वाढवले जाणार; केवळ घोषणा झाली, मात्र निर्णय नाही.  मानसिक ताण वाढला असून, भविष्य धोक्यात आल्याची भावना. अनिश्चित भरती प्रक्रियेमुळे आयुष्याचे गणित बिघडले. काय आहेत अडचणी?n राज्यसेवा पूर्व परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने ११ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ वर लक्ष केंद्रित.n संयुक्त गट- ‘क’ सेवा परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाहीच.n अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर पुढे काय करायाचे, हा मोठा प्रश्न. एमपीएससीने रिक्त जागांचे मागणीपत्र पाठवावे, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. किमान वेळापत्रक जाहीर झाले तर विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणे सोपे जाईल.    - महेश बडे,     एमपीएससी स्टुडंटस राइट्स  एमपीएससीने २१ मार्च रोजी घेतलेली परीक्षा ही २०१९ च्या मागणी पत्रकानुसार होती. २०२० च्या मागणी पत्रकानुसार होणाऱ्या परीक्षांचे काय, हा मोठा प्रश्न आहे.    - मनीषा सानप, परीक्षार्थी

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी