पुणे : राज्य लाेकसेवा आयाेगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ ची जाहिरात गुरुवारी (दि. ९) प्रसिद्ध केली आहे. यानुसार शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ५५२ पदांची भरती करण्यात येणार आहे. राज्यात एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर रविवारी, दि.१४ जून २०२६ रोजी ही परीक्षा हाेणार आहे.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहीत केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाने ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविले आहेत. त्यातून मुख्य परीक्षेच्या प्रवेशास पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. त्यात अर्ज सादर करण्याचा विहित कालावधी दि. १० एप्रिलला दुपारी २:०० ते दि. ३० एप्रिलला रात्री २३:५९ पर्यंत असणार आहे.
तसेच ऑनलाइन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. ३० एप्रिलला रात्री २३:५९ पर्यंत आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत २ मे रोजी रात्री २३:५९ पर्यंत असून, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ४ मे रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आहे.
Web Summary : MPSC announces recruitment for 552 Group-B posts through a joint preliminary exam on June 14, 2026, across 37 district centers. Online applications are open from April 10th to April 30th. Detailed schedule for the main exam will be released separately.
Web Summary : MPSC ने 552 ग्रुप-बी पदों के लिए 14 जून, 2026 को 37 जिला केंद्रों पर संयुक्त प्रारंभिक परीक्षा की घोषणा की। ऑनलाइन आवेदन 10 अप्रैल से 30 अप्रैल तक खुले हैं। मुख्य परीक्षा का विस्तृत कार्यक्रम अलग से जारी किया जाएगा।