शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

MPSC Exam Postponed: पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: March 11, 2021 16:25 IST

MPSC Students Protest in Pune Against Government decision: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला

ठळक मुद्देसरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्यागरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंयUPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का?

पुणे – अवघ्या काही दिवसांवर आलेली MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, पुण्यात हजारो विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती, मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.( BJP Oppose Thackeray Government decision of MPSC Exam Postponed)  

पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला, यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLC Gopichand Padalkar) यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या,?'[=

आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच १ लाख विद्यार्थी MPSC च्या परीक्षेसाठी पुण्यात राहतात, दर महिन्याला ९ ते १० हजार रुपये घराचे भाडे देतात, परंतु सरकारला या विद्यार्थ्यांसाठी काही देणंघेणं नाही. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, सरकार निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही. पोलिसांनी दादागिरी करू नये असं आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

काय म्हटलंय परिपत्रकात?

येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरात जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक पातळीवर पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तसेच एमपीएससीच्या उमेदवारांना देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र, १४ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा कायम राहिली आहे.

पहिल्यांदा २०१९ च्या मार्च महिन्यामध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर एमपीएससी नेच जाहीर करण्यात आलेली ११ ऑक्टोबर सुद्धा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे रद्द करण्यात आली. आता १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर