शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नावर कंटाळून पुण्याचे खासदारच बसणार उपोषणाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 01:02 IST

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचेच अनेक नगरसेवक पाण्याच्या तक्रारी करत आहेत. आमदारही हैराण झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्याच खासदारांनी उपोषणाचा इशारा दिल्याने पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे.

पुणे-  शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी अखेर खासदार अनिल शिरोळेच महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिरोळे यांच्याकडे अनेक दिवसांपासून नागरिक तक्रारी करत होते. तेदेखील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी बोलत होते. परंतु, तरीही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही.शिरोळे म्हणाले, की पुणे शहरातील प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी यासारख्या मध्यवर्ती भागांमध्येसुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात हे आश्चर्यजनक आहे. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे. सध्यातरी असे चित्र शहरात दिसत नाही. प्रत्येक घरातील महिलेची पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत मी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी फोनवरून बोललो. त्यांना पत्रही दिले. त्यांनी पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन फोनवरून मला दिले. महापौर मुक्ता टिळक यांच्याशीही चर्चा केली. मात्र, त्यानंतर पाण्याच्या तक्रारींबाबत वाढच झाली. आज तर त्याचा कहरच झाला. मॉडेल कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ ते १० हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक होते. मात्र, आज तेथे पाणी आलेच नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महापालिका पाणीच देऊन शकणार नसेल तर उपयोग काय? त्यामुळे शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.