शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आॅस्करसाठी चळवळ... सकारात्मक वातावरणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 03:53 IST

दर वर्षी भारताकडून आॅस्करसाठी दर्जेदार चित्रपट पाठविला जातो. मात्र, भारताला दर वेळी हुलकावणी मिळत असल्याने आॅस्करकडे नजर लावून बसलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडते. मग पुढच्या वर्षी पुन्हा आॅस्करकडे डोळे लागतात!

- नम्रता फडणीसपुणे - दर वर्षी भारताकडून आॅस्करसाठी दर्जेदार चित्रपट पाठविला जातो. मात्र, भारताला दर वेळी हुलकावणी मिळत असल्याने आॅस्करकडे नजर लावून बसलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडते. मग पुढच्या वर्षी पुन्हा आॅस्करकडे डोळे लागतात! मात्र, या वर्षभराच्या कालावधीत आपले भारतीय चित्रपट आॅस्कर अकादमीपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणत्याच हालचाली घडताना दिसत नाहीत. यासाठीच भारतीय चित्रपटांबद्दल एक सकारात्मक वातावरण निर्माण होण्याकरिता अमेरिकेतील आॅस्कर अकादमीच्या अंतर्गत उपक्रमांमध्ये भारतीय चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.आॅस्कर अकादमीचे सदस्य आणि ‘एसएमपीटीई’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतीय विभागाचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांची आॅस्कर अकादमीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच अमेरिकेतील लॉस एंजिलिसमधल्या आॅस्कर अकादमीला नुकतीच भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी आॅस्कर अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांच्याशी तब्बल दीड तास संवाद साधून आॅस्कर व भारतीय चित्रपटांची नाळ कशी जोडता येईल, याविषयी चर्चा केली. त्याविषयी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. उज्ज्वल निरगुडकर म्हणाले, ‘‘भारतीय चित्रपटाचा विदेशी विभागात आॅस्कर अ‍ॅवॉर्डमध्ये समावेश केला जातो. भारतात वर्षाला १,२०० चित्रपट बनविले जातात. त्यातील एकाच चित्रपटाची एंट्री पाठविली जाते. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील ९० देशांतले चित्रपट आॅस्कर अकादमीकडे येतात; मग त्यातील एक चित्रपट निवडला जातो.’’खास ज्युरींसाठी महोत्सव1 भारताला अधिक चित्रपटांची एंट्री करायला मिळायला हवी; मात्र ते व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे डॉन हडसन यांना भारतातल्या १० चित्रपटांचा महोत्सव भरवला जाऊ शकतो का? अशी सूचना केली. तो महोत्सव केवळ आॅस्कर ज्युरी सदस्यांसाठी असेल. त्यात राष्ट्रीय पुरस्कारविजेते किंवा क्लासिकल चित्रपट असतील.2आपणच दर वर्षी देशातून चित्रपट निवडून त्यांना चित्रपट दाखविण्याचा कार्यक्रम झाला, तर त्यांची भारतीय चित्रपटांबद्दलची मते किंवा मानसिकता बदलू शकते. आपल्याला विदेशी विभागात जेव्हा मतदान होते, तेव्हा सकारात्मक मत तयार होईल. आपल्याला मतदान होत नसेल, कारण कदाचित संपूर्ण चित्रपट हा पाहिला जात नसेल. हे कुणी सांगणार नाही. किमान आपल्याला प्रबोधन करता येणे शक्य आहे. डायरेक्टर आॅफ फिल्म फेस्टिव्हल यांच्यामार्फत तो करता येऊ शकतो. कान्स महोत्सवाला आपण आपले चित्रपट पाठवितो. असा एक उपक्रम चालविला जाऊ शकतो.3दर आठवड्याला आॅस्कर अ‍ॅकॅडमीचे विविध कार्यक्रम चालू असतात. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस मिळू शकतात. या सूचनेला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.९० देशातले चित्रपट आॅस्कर अकादमीकडे येतात; मग त्यातील एक चित्रपट निवडला जातो.१२०० चित्रपट भारतात वर्षालातयारहोतातआपल्या देशातली स्पर्धा अमेरिकेपेक्षा अधिक खडतर आहे. आपल्याकडून १,२०० मधून एक चित्रपट, तर तिकडे ९० मधून एक निवडतात. 

टॅग्स :Oscarऑस्करcinemaसिनेमा