शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ईव्हीएम मशिनविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:55 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीचा पुण्यात नारा : आंदोलन करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी

पुणे : ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ अशा घोषणा देत ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, या मागणीसाठी शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार व राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे, नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आले आहेत, असा आरोप सर्वच विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यामुळे ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.कर्नाटकच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले आहे, असा आरोप करून वंदना चव्हाण म्हणाल्या, ईव्हीएममधील गडबडीमुळे एका मतदार संघातील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन पुकारले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ईव्हीएमचा घोळ झाल्याचे समोर आले होते. जेवढे मतदान झाले तेवढीच मते मशिनमध्ये मोजली गेली पाहिजेत. मात्र, अनेक ठिकाणी मतमोजणीत घोळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईव्हीएम व्यवस्थित चालत नसल्याचे दिसून येते. लोकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेले प्रत्येक नागरिकाचे मत हे मोजताना ग्राह्य धरले पाहिजे, तरच नागरिकांचा लोकशाहीवर विश्वास बसेल. त्यामुळे यापुढील काळात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.रमेश बागवे म्हणाले, ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याची नागरिकांना शंका आहे. सर्वप्रथम भाजपाचे किरीट सोमय्या आणि सुब्रमण्यम स्वामी यांनीच ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. तसेच ईव्हीएमचा शोध लावणाऱ्या देशातही आता ईव्हीएमद्वारे आता मतदान घेतले जात नाही. तसेच जगातील अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. परिणामी ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे वारंवार समोर आल्याने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे.सत्तेसाठी भाजपाकडून लोकशाहीचा खूनकाँग्रेस व जनता दल सेक्युलर या दोन पक्षांची एकूण ११५ आमदार व दोन अपक्ष, असे दोन्ही पक्षांचे मिळून एकूण ११७ आमदार होत असताना कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाला आमंत्रित केले. त्यांनी संसदीय लोकशाहीचा खून केला. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने देशात लोकशाहीचा काळा दिवस म्हणून धरणे आंदोलन केले. शहर काँग्रेसच्या वतीने बेलबाग चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, गटनेते अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक