शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जागेची कागदपत्रे द्यावीत म्हणून मुलानेच केला आईचा खून; अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:27 IST

जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार  गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देजागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी आईला जबर मारहाणगेल्या काही दिवसांपासून मुलांकडूनच आपल्या जन्मदात्याना संपविण्याचे प्रकार

पुणे : जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार  गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र तपासणीनंतर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूणा मनोहर सपकाळ असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा आनंद सपकाळ (वय ४३) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईकडे जागेची कागदपत्रे देण्याचा त्याने सातत्याने तगादा लावला होता. ती देत नसल्याच्या कारणावरून तो आईला मारहाण करायचा, त्यादिवशी देखील त्याने आईला जबर मारहाण केल्यामुळे त्यात आईचा मृत्यू झाला. 

दरम्यान आई उठत नसल्याबद्दल मुलगा आनंद याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याच्या आईस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर कोठेही जखम नव्हती. मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्ट (छवविच्छेदन अहवाल) नंतर छातीवर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी या संबंधी तपास केला असता आई-मुलामध्ये भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांकडून पोलिसांना समजले. त्यानंतर मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुलांकडूनच आपल्या जन्मदात्याना संपविण्याचे प्रकार घडत असल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी शनिवार पेठ येथे मुलाने आई-वडिलांचा खून केला. वाघोली येथे मुलाने वडिलांचा तर एरंडवणा येथे आईचा खून केल्याची घटना घडली. ही तिसरी घटना आहे.

टॅग्स :MurderखूनPuneपुणे