शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 5:19 PM

पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास  उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

 पिंपरी : पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास  उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही बाब निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा अक्रम बागवान (वय २८), फातिमा अक्रम बागवान (वय २८), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय ९), झोया अक्रम बागवान (वय ७), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. यातील अलफिया आणि झोया या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मुलींवर अत्याचार होत असल्यानेच त्यांची आई फातिमा हिने दोन्ही मुलींना तसेच मुलगा जिआन यालाही गळफास लावून स्वत: आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी फातिमा यांचा पती अक्रम बागवान याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत हकीकत अशी की, बागवान कुटुंब चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात भोसरी येथे आले. काम शोधण्यासाठी अक्रम बागवान रविवारी (दि. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर घरात असलेल्या त्यांच्या पत्नी फातिमा यांनी घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्रम बागवान दुपारी चारच्या सुमारास घरी आले. घर आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दार वाजवले. मात्र दार कुणीही उघडले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर चौघांचे मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेनासाठी हलविण्यात आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.बागवान यांनी भोसरी येथे आल्यानंतर एका शाळेत मुलांना प्रवेश घेतला. मुलगी अलफिया चौथीत, झोया दुसरीत आणि मुलगा जिआन पाहिलीत शिकत होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीSuicideआत्महत्या