शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आईने घेतला मुलीचा जीव; अमेरिकेत जाण्यावरून सुरु होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 22:22 IST

अमेरिकेत जाण्यावर झालेल्या वादातून आईने मुलीचा खून केल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. या बाबत दत्तवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुणे : अमेरिकेत जाण्यावर झालेल्या वादातून आईने मुलीचा खून केल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. या बाबत दत्तवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सदर घटना तावरे कॉलनी येथे घडली आहे.सोमवारी दुपारी पाऊणच्या दरम्यान झालेल्या या थरारनाट्यात चिमुरडीने जीव गमावला आहे.  अक्षरा अमित पाटील (वय ६ वर्षे )असे तिचे नाव आहे. तर तिची आई श्वेता अमित पाटील (वय 36 वर्षे) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, श्वेता या बी कॉम'पर्यंत शिकल्या असून त्यांचा आणि पती अमित यांचा मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्या मनोरुग्ण आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे.

मात्र त्यांचा पतीसोबत अमेरिकेत जाण्यास विरोध होता  तर पती अमित यांचा त्याकरिता प्रयत्न होता. अखेर हा वाद सोडवण्यासाठी ते त्यांच्या काकांकडे अरविंद अपार्टमेंट तावरे कॉलनी येथे गेले. तिथे सुरु झालेल्या वादाच्या भरात त्यांनी मुलगी अक्षरा हिला स्वयंपाकघरात नेऊन कडी लावली. त्यानंतर टोकदार चाकू तिच्या हातात भोकसून नसा कापल्या. घरातल्यांनी हाका मारूनही त्या दरवाजा उघडत नव्हत्या. अखेर पोलिसांचे नाव घेतल्यावर तिने दार उघडले तेव्हा तिच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. यावेळी अक्षरा रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तिला तात्काळ ससून रुग्णालयात भरती केले असता ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे  राजेंद्र  सहाणे करत आहेत.  

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे