शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आई मैदानात अन् बाळ पोलिसांच्या कुशीत; भरतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ सांभाळले पोलिसांनी

By नारायण बडगुजर | Updated: July 6, 2024 21:14 IST

पोलिस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ रडत होते.

पिंपरी : पोलिस भरतीसाठी आलेल्या एका महिला उमेदवाराचे बाळ रडत होते. त्यामुळे पिंपरी - चिंचवड पोलिस दलातील एका महिला अंमलदाराने त्याला सांभाळले. आपले बाळ पोलिसांच्या कुशीत विसावल्याने संबंधित महिला उमेदवाराला मैदानी चाचणीवर लक्ष केंद्रित करता आले. या मदतीबाबत मैदानी चाचणीसाठी आलेल्या महिलेने पोलिसांचे आभार मानले.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात २६२ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे ही भरती १९ जून ते १० जुलै या कालावधीत होत आहे. २६२ जागांसाठी तब्बल १५ हजार ४२ अर्ज आले. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असल्याने २५ ते ३० जून या कालावधीत भरती प्रक्रिया स्थगित केली होती. १ जुलै पासून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. 

दरम्यान, शनिवारी (दि. ६) पहाटे एक महिला उमेदवार भरतीसाठी आली. तिच्यासोबत तिचे तान्हे बाळ होते. तान्ह्या बाळाला मैदानाच्या बाजूला ठेवून ती महिला शारीरिक चाचणीसाठी मैदानात होती. अचानक बाळ रडू लागले. बराच उशीर झाला तरी बाळ रडत होते. हा प्रकार मैदानात असलेल्या महिला पोलिस अंमलदाराने पाहिला. पोलिस महिलेने बाळाला घेऊन कुशीत घेतले. त्यानंतर बाळ शांत झाले. बाळ शांत झाल्याने उमेदवार महिलेने पोलिस भरतीवर लक्ष केंद्रित केले. पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे उमेदवार महिलेने पोलिसांचे आभार मानले.

सहा हजार पुरुष उमेदवारांची चाचणी पूर्णपिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीसाठी १९ जून ते ५ जुलै दरम्यान ११५५३ पुरुष उमेदवारांना बाेलावण्यात आले होते. त्यापैकी ६८०१ उमेदवार हजर राहिले. त्यातील ५९५८ उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली. 

पहिल्याच दिवशी ७२९ महिलांची चाचणीपिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत ६ जुलै रोजीपासून महिला उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाी. यात पहिल्याच दिवशी १२०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. त्यात ८६४ महिला हजर राहिल्या. त्यातील ७२९ महिला उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस