शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

"सत्ताधाऱ्यांच्याच काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:20 IST

केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात.

नारायणगाव : केंद्रातील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? शिवरायांचे नाव घेवून सन २०१४ मध्ये विजयी झालात. ज्या रयतेने कल्याणकारी राज्य म्हणून निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडवर नव्हे तर कुठल्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा आणून त्या पैशातून दहशतवाद्यांविरोधत कारवाई करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची जन्मभूमी असलेल्या नारायणगाव येथे स्वागत मेळाव्याचे आयोजन जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, युवा नेते अतुल बेनके, प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, अशोक घोलप, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे, निवृत्ती काळे, देवदत्त निकम, राजश्री बोरकर उपस्थित होते.डॉ. कोल्हे म्हणाले, पुलवामा हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले. मात्र, एका वृत्तपत्रामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात ४५० जवान शहीद झालेले असताना ५६ इंचांची छाती दिसते कशी? शिवनेरीचा शिलेदार म्हणून १५ वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ शकले नाहीत.अजित पवार म्हणाले की, पुरंदरला विमानतळ नेण्याचे पाप कुणाचे आहे. बाह्यवळणाची कामे का बंद पडली आहेत. खेड ते सिन्नर या रस्त्याचे १३८ कि.मी.पैकी १०९ कि.मी.चे काम झाले आहे. २९ कि.मी.चे काम अपुरे राहिले यास जबाबदार कोण आहे? रेल्वे येणार हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सांगतात. आता तर हायस्पीड रेल्वे येणार, अशी घोषणा करणाऱ्यांनी पहिली रेल्वे तर सुरू करून दाखवावी. यावेळी दिलीप वळसेपाटील, विलास लांडे, अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, सत्यशील शेरकर यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. हिरापंकज पिंपळगावकर यांनी केले.>सिनेअभिनेते, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत असल्याने मंगळवारी नारायणगाव येथे झालेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. परंतु, अजित पवार यांनी उमेदवारीबाबत बगल देत जुन्नरकरांच्या मनातील उमेदवार देण्यात येईल, असे भाषणात दोन-तीन वेळा उल्लेख केल्याने डॉ. कोल्हे यांनाच उमेदवारी मिळेल, असे वाटत असताना डॉ. कोल्हे यांना स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण राज्यात त्यांच्यावर जबाबदारी टाकणार असल्याचे सांगितल्याने नेमकी लोकसभेची उमेदवारी कोणाला याबाबत उलट सुलट चर्चा सभा सुटल्यानंतर सुरू होती. डॉ. कोल्हे यांना उमेदवारी जाहीर होणार, असे समजून आलेले त्यांचे चाहते उमेदवारी जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त करत निघून गेले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९