शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
4
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
5
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
6
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
7
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
8
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
9
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
10
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
11
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
12
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
13
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
14
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
15
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
16
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
17
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
18
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
19
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
20
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरांमध्ये वाढताहेत सर्वाधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:12 IST

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मागील दोन आठवड्यांपासून झपाट्याने वाढत चालली आहे. मागील डिसेंपासूनची ही सर्वाधिक वाढ नमूद करण्यात ...

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मागील दोन आठवड्यांपासून झपाट्याने वाढत चालली आहे. मागील डिसेंपासूनची ही सर्वाधिक वाढ नमूद करण्यात आली आहे. साधारणपणे ७ फेब्रुवारीपासूनच्या आकडेवारीवरुन उपनगरांमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेषत: हडपसर-मुंढवा, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, धनकवडी-सहकारनगर, बिबवेवाडी, औंध-बाणेर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शहराच्या मध्यवस्तीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यानंतर हा संसर्ग हळूहळू उपनगरांमध्ये वाढत गेला. या काळात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठेमध्ये आढळून येत होते. त्याखालोखाल ढोले पाटील रस्ता, ताडीवाला रोड आदी परिसर होता. परंतु, प्रशासनाच्या उपाययोजना आणि नागरिकांनी त्याला दिलेला प्रतिसाद यामुळे या भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती.

मागील दोन आठवड्यांत झपाट्याने रुग्णवाढ होत चालली आहे. मात्र, ही रुग्णवाढ उपनगरांमध्ये अधिक होत असून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये सर्वात कमी रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे. तर सर्वाधिक वाढ हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये नोंदविण्यात आलेली आहे. उपनगरांमध्ये खबरदारी बाळगण्यात होत असलेली ढिलाई, पोलीस-पालिकेकडून कारवाई करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, व्यापारी आस्थापनांमध्ये धुडकावले जाणारे सुरक्षा नियम यामुळे कोरोना वाढीस हातभार लागत आहे.

====

क्षेत्रीय कार्यालय २३ फेब्रुवारी ७ फेब्रुवारीपासूनची वाढ

हडपसर-मुंढवा 91 659

सिंहगड रस्ता 54 488

वारजे-कर्वेनगर 71 476

धनकवडी-सहकारनगर 61 475

बिबवेवाडी 59 430

नगर रस्ता- वडगाव शेरी 31 421

औंध-बाणेर 63 404

कोथरुड-बावधन 62 395

कसबा-विश्रामबाग 51 320

कोंढवा-येवलेवाडी 29 276

येरवडा-कळस 17 248

ढोले पाटील 24 188

शिवाजीनगर-घोलेरस्ता 18 182

वानवडी-रामटेकडी 11 166

भवानी पेठ 19 136