शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:38 IST

भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही जागांचा हा मागोवा. या जागांवर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉट म्हणून होत असते. 

पुणे : भूत किंवा एखाद्या अदृश्य शक्तिविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. या गोष्टी कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत याविषयी अजूनही संभ्रम असला तरी काही ठिकाणी अशी रहस्ये आहेत असा ठोस दावा केला जातो. पुण्यातल्या अशाच काही विशेष जागांचा घेतलेला हा आढावा. शनिवारवाडा :

शनिवारवाडा:

जसा पराक्रमासाठी ओळखला जातो तसाच काही गूढांमुळेही ओळखला जातो. एकेकाळच्या वैभवाची निशाणी सांगणारा शनिवाड्यावर आजही अनेक पर्यटक येत असतात.या वाड्यात आजही रात्री उशिरा किंकाळ्या ऐकू येतात अशी चर्चा असते. शनिवारवाडा कधीही रात्री ८ नंतर बघण्यासाठी खुला ठेवण्यात येत नाही. 

व्हिक्टरी थिएटर :

पुण्यात कॅम्प परिसरात असलेले व्हिक्टरी थिएटर भयंकर भीतीदायक असल्याचे मत काही जण व्यक्त करतात. कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व प्रेक्षक बाहेर जाऊनही आतमध्ये काहीवेळा हसण्याचे आवाज येत असतात असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. 

सिंहगड किल्ला :

इतिहासाची साक्ष देणारा सिंहगड किल्ल्यावरची काही व्यक्तींना अदृश्य शक्तीचे आवाज आले आहेत. काही वर्षांपूर्वी या किल्ल्यावर झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा आवाज दरीतून येत असल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. 

चंदननगरमधली 'ती':

चंदननगर हे पुण्याला लागून असलेले उपनगर आहे. या भागात अनेकांना हातात बाहुली घेवून जाणारी लहान मुलगी मध्यरात्री दिसली आहे. ही मुलगी एका इमारतीच्या बांधकामाच्यावेळी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. 

 

होळकर ब्रिज :

जुन्या होळकर ब्रिजवर अनेकांना विचित्र अनुभव आले आहेत. त्या पुलावरून मध्यरात्री जाताना अनेकांचा थरकाप उडत असे. या पुलावर झालेल्या अपघातात मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या मात्र नवा पूल झाल्यामुळे जुन्यापुलावरची वाहतूक कमी झाली आहे. 

(हा लेख विविध ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीवरून घेतला आहे. या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देण्याचा लोकमतचा मानस नाही.) 

 

 

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरPune Campपुणे कॅम्पshanivar wadaशनिवारवाडाsinhagad fortसिंहगड किल्ला