शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी जादा गाड्या, आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:57 IST

पिंपरी-चिंचवड वल्लभनगर एसटी आगारामधून दिवाळी सणाकरिता शहरातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत खेडेगावात जाण्यासाठी ६० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून, सध्या आगारामध्ये आगाऊ आरक्षण नोंदणी करिता नागरिक मोठी गर्दी

नेहरुनगर : पिंपरी-चिंचवड वल्लभनगर एसटी आगारामधून दिवाळी सणाकरिता शहरातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत खेडेगावात जाण्यासाठी ६० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून, सध्या आगारामध्ये आगाऊ आरक्षण नोंदणी करिता नागरिक मोठी गर्दी करीत आहेत़ आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या ५० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगार हे आगार शहरातील मुख्य आगार असून, या आगारातून महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे, तालुके, शहरे, खेड्यापाड्यात एसटी जाते. दिवाळी सण अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे अनेक नागरिक एसटी बसेसचे आरक्षण करीत असून, आरक्षण करण्यासाठी आगारामध्ये मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. सध्या ५० टक्के आरक्षण फुल्ल झाले असून, दिवाळी पर्यंत १०० आरक्षण फुल्ल होण्याची शक्यता आहे.सध्या मराठवाडा विदर्भ या भागात जाण्यासाठी सर्वांत जास्त एसटी बसेसचे आरक्षण होत असल्याचे आरक्षण नोंदणी अधिकारी अश्विनी शिंदे यांनी सांगितले.वल्लभनगर आगाराने प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविल्या आहेत. तसेच चार आणि सात दिवसांचा आवडेल तेथे प्रवास हा पास घेण्यासाठीही गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTravelप्रवास