शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅगिंग’ची अकराशेहून अधिक प्रकरणे निकाली; ‘यूजीसी’ची माहिती : गतवर्षी १,२४० प्रकरणांची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 09:50 IST

यूजीसीने यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हास्तरीय रॅगिंगविराेधी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच रॅगिंगविराेधी नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये रॅगिंग प्रकरणांना आळा बसावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे कठाेर पावले उचलली जात आहेत. मागील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये उच्चशिक्षण संस्थांमध्ये घडलेल्या रॅगिंग प्रकरणांपैकी ९० टक्के प्रकरणे निकाली काढली आहेत. यूजीसीने यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हास्तरीय रॅगिंगविराेधी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच रॅगिंगविराेधी नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी जानेवारी २०२३ ते २८ एप्रिल २०२४ या शैक्षणिक वर्षात उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या १,२४० घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी यूजीसीने १,११३ प्रकरणांचा निपटारा केला आहे, तसेच त्यातील १२७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांचा तपास केला जात आहे. 

यूजीसीच्या टोल-फ्री अँटी-रॅगिंग हेल्पलाइन क्रमांक (१८००-१८०-५५२२) यासह विद्यार्थी त्यांच्या तक्रारी गाेपनीय यूजीसीच्या सुरक्षित पोर्टल www.antiragging.in द्वारे नाेंदवू शकतात, तसेच विद्यार्थी helpline@antiragging.in वर मेलही करू शकतात. समाज माध्यमे, तसेच वर्तमानपत्रांमधील बातम्यांच्या आधारेही यूजीसीकडून कारवाई केली जाते.

अशी केली जाते कारवाईयूजीसीच्या रॅगिंगविराेधी हेल्पलाइन, पाेर्टल अथवा ई-मेलवर विद्यार्थ्यांनी संपर्क साधत मदत मागितली असता, तातडीने संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालयासह पाेलिसांकडे तक्रार पाठविण्यात येते व त्याचा तपास केला जाताे. यामध्ये विद्यार्थ्याची ओळख उघड केली जात नाही.

कुणाच्या किती तक्रारी?n८२ टक्के - विद्यार्थीn१७.७४ टक्के - विद्यार्थिनी n०.०८ टक्के - तृतीयपंथी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी