शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:45 IST

सध्या शहरामध्ये पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या भांडणात पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असतानाच शहरामध्ये तीनपट म्हणजे तब्बल ४ लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : सध्या शहरामध्ये पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या भांडणात पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असतानाच शहरामध्ये तीनपट म्हणजे तब्बल ४ लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील बहुचर्चीत २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजने अतंर्गत एल अ‍ॅन्ड टी कंपनीच्या वतीने व्यावसायिक, औद्यागिक वापराच्या आणि घरगुती नळ कनेक्शनची तपासणी केली. यामध्ये ही वस्तुस्थिती समोर आली असून, एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून सर्व्हेचा डेटा नुकताच पाणी पुरवठा विभागाकडे दिला आहे.शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठ्याच्या पुरता बोजवारा उडाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा शिल्लक असताना दोन विभागाच्या भांडणामध्ये पुणेकरांना हक्काच्या पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या महापालिका दररोज १३५० एमएलडी पाणी धरणातून उचलत असताना अनेक भागामध्ये पुरेसा पाणी साठ मिळत नाहीत. शहरात फोफावलेल्या अनधिकृत नळ कनेक्शनमुळे अनेक भागात पाण्याचा दाब एवढा कमी असतो की पहिल्या मजल्यावर देखील पाणी पोहचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची ही चोरी सुरू असून, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून शहरातील प्रामुख्याने शंभर टक्के व्यावसायिक नळ कनेक्शनची तपासणी केली. यात सर्व हॉस्पिटल, लॅब, क्लिनिक, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, रेस्टॉरन्ट, हॉस्टेल्स आदी सर्व ठिकाणची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे समोर आले. याशिवाय काही भागात घरगुती वापराचेदेखील नळ कनेक्शनची तपासणी करण्यात आली आहे.>पाणीपट्टी : थकबाकी ५०० कोटींच्या घरातशहरामध्ये अधिकृत नळ कनेक्शनची संख्या १ लाख ६० हजारच असली तरी पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ५०० कोटींच्या घरात गेली आहे. थकबाकी दारांमध्ये देखील व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक जास्त असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील सर्व अधिकृत ४० हजार व्यावसायिक प्रॉपर्टींना मिटर बसविण्यात आले असल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले..अनधिकृत नळ कनेक्शनची माहिती लवकरच जाहीर करणारशहरामध्ये सध्या २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून, शंभर टक्के प्रॉपर्टींना पाणी मिटर बसविण्यात येणार आहे. यासाठी योजनेचे काम देण्यात आलेल्या एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून शहरातील सर्व प्रॉपर्टीचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक अहवालामध्ये तब्बल तीनपट अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीकडून सर्व्हे संदर्भातील सर्व डेटा पाणी पुरवठा विभागाकडे दिला असून, येत्या महिन्यात सर्व डेटाचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शनची माहिती जाहीर करण्यात येणार आहे.-व्ही. जी. कुलकर्णी,मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभागशहरामध्ये तब्बल आठ लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक आहेत. अधिकृत नळ कनेक्शनची संख्या केवळ १ लाख ६० हजार एवढीच आहे. यामध्ये केवळ ४० हजार नळ कनेक्शन व्यावसायिक व औद्यागिक स्वरूपाची आहेत.

टॅग्स :Waterपाणी