शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच अधिक आर्थिक घोटाळे, नागरी सहकारी बँक महासंघाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:30 IST

नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात पाच वर्षांत १ हजार गैरव्यवहार झाले असून, त्यात २२० कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, नागरी बँकांमध्ये खळबळ माजली.

पुणे : नागरी सहकारी बँकांमधे पाच वर्षांत २२० कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती विपर्यस्त असून, घोटाळ्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाच आघाडीवर असल्याचे आकडे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाने दिले आहेत. केवळ २०१८-१९ या वर्षात ७१ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांपैकी ६५ हजार ५०९ कोटींचे घोटाळे राष्ट्रीयकृत बँकांतच झाल्याचे महासंघाने सांगितले.

नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात पाच वर्षांत १ हजार गैरव्यवहार झाले असून, त्यात २२० कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, नागरी बँकांमध्ये खळबळ माजली. या वृत्ताचे नागरी सहकारी बँक महासंघाने खंडन केले. प्रसिद्ध माहितीनुसार, नागरी बँकिंग क्षेत्रात १९१८-१९ मध्ये १८९ प्रकरणांमध्ये १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यात कॉसमॉस बँकेतील सायबर हल्ल्यातील ९४ कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, याला घोटाळा म्हणता येणार नाही. ही रक्कम वजा केल्यास १८० प्रकरणांमध्ये ३३ कोटी ७० लाख रुपये गुंतले आहेत. सरासरी १८ लाख रुपये प्रत्येक प्रकरणामध्ये गुंतले आहेत, असा दावा महासंघाने केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत बँकामध्ये ९५ हजार ७०० कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. यातील प्रकरणांची संख्या ५ हजार ७४३ इतकी असून, प्रत्येक प्रकरणामध्ये सरासरी १७ कोटी रुपये गुंतले आहेत. यात स्टेट बँक आॅफ इंडियाचा सर्वाधिक २५ हजार ४०० कोटी रुपयांचा वाटा आहे.गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) राष्ट्रीयकृत बँकांमधील घोटाळा ७१ हजार ५०० कोटी रुपयांचा होता. केंद्र सरकारने त्यांना७० हजार कोटी रुपयांची भांडवली मदत केली होती. त्यापूर्वीच्या (२०१७-१८) आर्थिक वर्षात घोटाळ्याची रक्कम ४१ हजार १६७ कोटी रुपये होती. केवळ दीड वर्षांत ही रक्कम दुप्पट झाली.अशी टीका करणे अयोग्यराष्ट्रीयकृत, खासगी, परदेशी आणि इतर आर्थिक संस्थांमधील घोटाळ्यांची तुलना केल्यास नागरी सहकारी बँकांचे प्रमाण अल्प ठरते. केवळ नागरी बँकांची प्रसिद्धी देणे योग्य नसल्याचे मत, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :bankबँक