शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोचे आंदोलन एक महिना पुढे, फुरसुंगी ग्रामस्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 03:23 IST

महापालिकेकडून फुरसुंगी गावात प्रस्तावित केलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यामुळे शुक्रवार (दि.२०) पासून सुरू करण्यात येणारे आंदोलन फुरसुंगी ग्रामस्थांनी एक महिनाभर पुढे ढकलले आहे.

पुणे : महापालिकेकडून फुरसुंगी गावात प्रस्तावित केलेली विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यामुळे शुक्रवार (दि.२०) पासून सुरू करण्यात येणारे आंदोलन फुरसुंगी ग्रामस्थांनी एक महिनाभर पुढे ढकलले आहे. फुरसुंगी ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे नवनियुक्त आयुक्तांचे विघ्न मात्र सध्या तरी टळले आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त विकास देशमुख यांचे महापालिकेतील स्वागत कचऱ्यानेच झाले होते. त्यानंतर शहरातील कचरा चांगलाच पडला होता.गेल्या अनेक वर्षांपासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे ऐन उन्हाळ्यात शहराचा कचरा प्रश्न चांगलाच पेटायचा; परंतु आठ महिन्यांपूर्वीच फुरसुंगी ग्रामपंचायतीचा महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. यामुळे आता शहराचा कचराप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रशासनाला वाटले होते; परंतु फुरसुंगी गावाचा महापालिकेत समावेश होऊन देखील प्रशासनाकडून गावातील पायभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत ग्रामस्थांनी पुन्हा डेपोत कचरा टाकू न देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ग्रामस्थांनी २० एप्रिल पासून महापालिकेच्या कचºयांच्या गाड्या डेपोत येऊ न देण्याचाइशारा दिला होता. त्यामुळे या उन्हाळ्यातदेखील कचºयाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यतानिर्माण झाली होती.गावातील कामांबाबत अनेकदा चर्चा झाली आहे; परंतु कामे होत नाहीत. त्याबाबत महापौर आणि आयुक्तांसोबत समाधानकारक चर्चा आहे. येत्या महिनाभरात कामे करण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.ग्रामस्थ-अधिकाºयांची बैठकग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत फुरसुंगीतील लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांची बैठक झाली. पायाभूत सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी लावून धरला होता. याबाबत घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले, ग्रामस्थांच्या मागण्यानुसार कामे करण्यात येणार आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळेआंदोलन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कचरा वाहतूक सुरू राहील.

 

टॅग्स :Puneपुणे