शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

एकपडदा चित्रपटगृहांना घरघर, शासनाची उदासीनता कायम, मल्टिप्लेक्सची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:42 IST

आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुणे : आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.तरीही एकपडदा चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट चालले नसल्याने संक्रांत कायम आहे. प्रेक्षकवर्ग मराठी चित्रपट पाहण्यासाठीही मल्टिप्लेक्सला पसंती देत असल्याने चित्रपटांच्या ‘अच्छे दिन’चा एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायाला काहीच लाभ झालेला नाही.सध्याच्या मल्टिप्लेक्स संस्कृतीमध्ये एकपडदा चित्रपटगृहांसमोरील अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे. मल्टिप्लेक्समध्ये करमणूक क्षेत्रातील उद्योगसमूह पैसे गुंतवत आहेत. त्या तुलनेत एकपडदा चित्रपटगृहचालकांकडे चित्रपटाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पैसे नाहीत, हे वास्तव आहे. प्रेक्षकवर्ग फिरकत नसल्याने एकपडदा चित्रपटगृहचालकांना हा व्यवसाय परवडत नाही.मात्र, शासनाच्या नियमानुसार, एकपडदा चित्रपटगृहचालकांनी दुसºया व्यवसायामध्ये प्रवेश करण्याचे ठरवल्यास त्यांना सध्याच्या तुलनेत एक तृतीयांश आसनव्यवस्थेचे चित्रपटगृह विकसित करावे लागते.जागा विकसित करण्यासाठी, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळावा, अशी मागणीही सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे.५४ स्क्रीन वाढणारएकीकडे एकपडदा चित्रपटगृहे अनेक समस्यांचा सामना करीत असताना दुसरीकडे मल्टिप्लेक्सची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या २३ मल्टिप्लेक्स असूून, ११६ स्क्रीनच्या माध्यमांतून प्रेक्षक चित्रपटांचा आनंद लुटत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच दहा प्रस्तावित मल्टिप्लेक्सची भर पडत असून, त्याद्वारे ५४ स्क्रीन वाढणार आहेत.१ विजय थिएटरचे दिलीप निकम म्हणाले, ‘गेल्या महिन्याभरात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी एकपडदा चित्रपटगृहांचा व्यवसाय वाढलेला नाही. अनेकदा चित्रपटगृहे रिकामी असल्याचेच चित्र पाहायला मिळते. चांगल्या चित्रपटांमुळे आपल्या चित्रपटगृहांवर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.२ इतर वेळच्या तुलनेत १० टक्केही लाभ झालेला नाही.’ चित्रपटगृहांच्या नूतनीकरणामध्ये अडचणी येतात. अनेक चित्रपटगृहांच्या इमारती जुन्या आणि मध्यवर्ती भागात आहेत. या जागा विकसित करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही.३ एफएसआयचा अभाव, रहदारी, पार्किंगचा प्रश्न आदी समस्या ‘आ’वासून उभ्या आहेत. एकपडदा चित्रपटगृहांचे रुपांतर मल्टिप्लेक्समध्ये करायचे झाल्यास जागेची उपलब्धता ही मोठी अडचण ठरते. अनेकदा शासनाकडे अर्ज करून, पालकमंत्र्यांची भेट घेऊनही दखल घेतली जात नसल्याने एकपडदा चित्रपटगृहमालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या अनेक वर्षांमध्ये एकपडदा चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागलेला नाही. चांगला चित्रपट आला, की प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाहतात. त्यामुळे एकपडदा चित्रपटगृहांकडे ते फिरकताना दिसत नाहीत.उत्तम आणि आरामदायी आसनव्यवस्था, चकचकीत आणि भव्य स्क्रीन, प्रेक्षकांना आल्हाददायक वाटणारी वातानुकूलित यंत्रणा यामुळे प्रेक्षक तिकडेच वळताना दिसतात.उत्पन्नाची मर्यादा कमी असल्याने एकपडदा चित्रपटगृहांमध्ये या सुविधा देणे शक्य होत नाही.सध्या पुण्यामध्ये १६ एकपडदा चित्रपटगृहे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये १५ एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत.

टॅग्स :cinemaसिनेमाPuneपुणे