पुणे : राहुल टॉकीजच्या ३५ लाख ६९ हजार १२६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक व सुपरवायझरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शशिकांत चंद्रकांत नगरकर (रा. नवी सांगवी) आणि त्रिंबक कोंडीबा भुजबळ (रा. रामनगर, पिंपळे गुरव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर साथीदार असिस्टंट मॅनेजर सतीश भाऊराव शिंदे (रा. नवी सांगवी) हा फरार आहे. याप्रकरणी राहुल टॉकीजचे मालक शिवाजी गणपतराव जगताप (वय ५९, रा. गणेशखिंड रोड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा राहुल टॉकीजमध्ये व्यवस्थापक म्हणून, तर शिंदे सहायक व्यवस्थापक आणि भुजबळ सुपरवायझर म्हणून काम करीत होते. आरोपींनी सिनेमागृहामध्ये १० आॅक्टोबर २०१५ ते १ डिसेंबर २०१५ या कालावधीत तिकीट विक्रीमधून जमा झालेल्या ४१ लाख ६९ हजार १२६ रुपयांपैकी ३५ लाख ६९ हजार १२६ रुपयांची रक्कम बँकेत न भरता या रकमेचा अपहार केला.
पैशांचा अपहार करणारे अटकेत
By admin | Updated: November 14, 2016 03:13 IST