शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे आले, बँकेत जमा होईना; कालवा दुर्घटनाग्रस्तांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 03:17 IST

काही बाधितांकडे बँक खाते नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे संबंधितांचे बँक खाते उघडण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे.

पुणे : राज्य शासनाकडून कालवाबाधितांना ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, महिनाभरात मदतीची रक्कम बाधितांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही बाधितांकडे बँक खाते नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे संबंधितांचे बँक खाते उघडण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाला. मात्र, काही कालवाबाधितांकडे बँक खात्याचा क्रमांक नसल्यामुळे निधी जमा करण्यास अडचणी येत आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडून बाधितांसाठी तीन कोटी रुपयांचा मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना मदतनिधीचे वाटप सुरू केले. मात्र, मागील आठवड्यापर्यंत ३ कोटी रुपयांपैकी बाधितांना ३0 लाख रुपयांचे वाटप झाले होते. त्यातील पूर्णत: बाधित ३८ कुटुंबांना १९ लाख रुपयांचे, तर अंशत: बाधित २८ कुटुंबांना ११ लाख ४३ हजार रुपये, असे एकूण ३० लाख ४३ हजार रुपयांचे वाटप झाले आहे.पूर्णत: बाधित ८८ कुटुंबांपैकी ५० कुटुंबांकडे बँकखाते क्रमांक नाही. तसेच अंशत: बाधित ८६४ कुटुंबांपैकी ८३६ जणांकडे बँक खाते क्रमांक नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे बँक खाते उघडण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून शासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार ७३० कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यात ८८ कुटुंबे पूर्णत:, तर ८६४ कुटुंबे अंशत:बाधित आहेत. दुर्घटनेमध्ये पक्क्या घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब ९५ हजार शंभर रुपये, कच्ची घरे/ झोपडीधारकांना आणि किमान पंधरा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पक्के-कच्चे घर किंवा झोपडीधारकांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहेत.बाधितांपैकी ज्यांच्याकडे बँक खाते नाही, त्यांचे खाते उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी शिबिर घेतले जाणार आहे.- नवल किशोर राम,जिल्हाधिकारी, पुणे

टॅग्स :Puneपुणे