शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

मोदींची जुमलेबाजी; बापटांची फेकूगिरी - मोहन जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 02:23 IST

मोहन जोशी : पुण्यातील कार्यक्रमावर टीका

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी पुण्यात झालेला कार्यक्रम म्हणजे निवडणुकीची जुमलेबाजी होती. त्याच कार्यक्रमांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या विकासाच्या बाता मारत फेकूगिरीत आपणही कमी नाही, हे पंतप्रधानांना दाखवून दिले, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली.

मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित मंगळवारी झालेल्या हिंजवडी मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रम म्हणजे भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा चुनावी जुमला होता, असे सांगून जोशी म्हणाले, निवडणुकांपुर्वी व नंतरही भरमसाठ घोषणा करायच्या, हजारो कोटी रुपयांच्या गप्पा करायच्या, हीच आता मोदी यांची ओळख झाली आहे. पुण्यातही त्यांनी तेच केले. स्मार्ट सिटीची दीड हजार कोटी रुपयांची कामे कुठे आहेत, कोणाला दिसली आहेत, ते त्यांनी जाहीर करावे. खोटे बोलायचे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. अशा अनेक थापा ते मारत असतात. त्यांचे म्हणणे खरे असेल तर राज्य सरकारनेच स्मार्ट सिटी कंपनीची दीड हजार कोटी रुपयांची कामे जाहीर करावीत, म्हणजे पुणेकरांना निदान ती कुठे आहेत, ते तरी समजेल, असे जोशी म्हणाले. शहरांची नावे बदलायची ही तर भाजपाची परंपराच आहे. शहरांपुरती ते वापरत होते. मात्र, आता त्यांनी देशाच्या थोर नेत्यांची जन्मभूमीही बदलायचा प्रकार सुरू केला आहे. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मभूमीही मोदी यांना माहिती नाही. पुणे ही त्यांची जन्मभूमी असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे असे जोशी म्हणाले.भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये सत्तेची गुर्मीमोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराज असा उल्लेख न करता फक्त छत्रपती शिवाजी असा उल्लेख केला तो अवमान करणारा आहे, असे जोशी म्हणाले. भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये सत्तेची गुर्मी असून आपण बोलू ते ऐकले जाईल, अशी त्यांची भावना झाली आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्यात तेच दिसून आले. काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करत आहे, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे