शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार कामगारविरोधी, इंटकची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:20 IST

केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेच पण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे

पुणे - केंद्रातील मोदी सरकार बेरोजगारांना नोकरीचे आश्वासन देत सत्तेवर आले, मात्र सत्ता मिळताच ते बेरोजगारांना तर विसरलेचपण ज्यांच्या नोकऱ्या आहेत, त्यांच्यावरही गदा आणत आहेत, हे सरकार भांडवलदारांचे लाड करणारे आहे, देशातील असंघटित कामगारच त्यांना त्यांची जागा दाखवेल अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व आॅल इंडिया इंटकचे उपाध्यक्ष रामचंद्र खुंटिया यांनी केली.राष्ट्रीय मजदूर संघाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.खुंटिया यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार भाई जगताप, अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे उपाध्यक्ष इरफान आलम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे आदी या वेळी उपस्थित होते.संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी संघटनेच्या कामाचा धावता आढावा घेत कामगारांचे हित केंद्रव राज्य सरकारने धोक्यात आणले असल्याची टीका केली. असंघटित कामगारांची संख्या वाढत आहे,त्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत व सरकार त्यांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे असे इरफान आलम यांनी सांगितले. या कामगारांना संघटित करून त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यात येतील, असे ते म्हणाले.आमदार जगताप, हर्षवर्धन पाटील यांचीही या वेळी भाषणे झाली. सुजाता आल्हाट, वैशाली कटके, जयद्रथ सावंत, भीमराव कांबळे यांचा कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यातआला. सीताराम चव्हाण यांनी स्वागत केले. काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. पळसे यांनी आभार मानले.काँग्रेसने कधीही कामगारांना देशोधडीला लावले नाही, कामगारहिताचे कायदे काँग्रेसच्याच काळात झाले, आता मात्र केंद्र सरकारने त्या कायद्यांची मोडतोड चालवली आहे. मालकधार्जिण्या या धोरणाचा देशातील सर्व कामगार एकत्र येऊन विरोध करतील व हे सरकार खाली खेचेल असा विश्वास खुंटिया यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार