शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

‘माळीण’च्या मजबूत घरांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार

By admin | Updated: January 24, 2016 02:02 IST

डोंगराखाली गेलेल्या माळीण गावातील गावकऱ्यांसाठी बांधली जाणारी नवीन घरे मात्र अभेद्य आणि मजबूत असावीत असा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने या घरांच्या भक्कमपणासाठी तंत्रज्ञानाचा

- नीलेश काण्णव, घोडेगाव

डोंगराखाली गेलेल्या माळीण गावातील गावकऱ्यांसाठी बांधली जाणारी नवीन घरे मात्र अभेद्य आणि मजबूत असावीत असा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने या घरांच्या भक्कमपणासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. माळीण पुनर्वसनाअंतर्गत बांधली जाणारी घरे अ‍ॅल्युफॉम या नवीन तंत्रज्ञानाने बांधली जाणार आहे. यामुळे घरे मजबूत होणार आहेत. डोंगरावरून मोठा दगड या घरांवर आला तरी ही घरे पडणार नाहीत, मोडणार नाहीत किंवा हलणारही नाहीत. त्यामुळे घरातील लोक सुरक्षित राहतील. बॉक्ससारखी स्थिरता या घरांना असणार आहे. तसेच ५ रिष्टर स्केलपर्यंत भूकंपाचे हादरेदेखील ही घरे सहज सहन करू शकतील, अशा स्वरूपाची सुंदर, टुमदार घरे होणार आहेत. माळीण पुनर्वसनासाठी पायाभूत सुविधांच्या कामांना सुरवात झाली असून यामध्ये रोड, अंतर्गत रस्ते, पावसाचे पाणी निचरा करण्याचे नाले आदी कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. यासाठी आवश्यक असलेला तांत्रिक सल्ला तसेच सुरू असलेली कामे योग्य मापदंडाप्रमाणे व उत्तम दर्जाची सुरू आहेत का, हे पाहण्यासाठी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनी पुढाकार घेतला आहे. सीओईपीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रोफेसर भालचंद्र बिराजदार यांनी माळीणला भेट देऊन पाहणी केली. भालचंद्र बिराजदार यांनी लातूरला भूकंप झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसनामध्ये काम केले आहे. माळीण पुनर्वसनाची जागा व घरांची रचना या विषयी ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, माळीण पुनर्वसनासाठी निश्चित झालेली आमडेची जागा सुरक्षित आहे. ही जागा निवडताना इंजिनिअरिंगला प्राधान्य दिले, नंतर गावकऱ्यांनी देखील सहमती दिली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. नवे माळीण ठरेल आदर्शमाळीणचे पुनर्वसन मैलाचा दगड ठरणार आहे. कारण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गोष्टी अत्याधुनिक आहेत. या घरांना शंभर वर्षे रंगवगळता काहीही करण्याची आवश्यकता नाही. पूर्ण घर स्टिल व काँक्रीटमध्ये होणार आहे. ही घरे अ‍ॅल्युफॉममध्ये होणार आहेत. यामध्ये अ‍ॅल्युमिनियमचे पडदे नटबोल्टमध्ये फिट करून काँक्रीट भरले जाते. त्यामुळे फिनिशिंग चांगले येते. साईटवर एखाद्या लेबरने चुका करायच्या म्हटल्या तरी होत नाहीत, तसेच घरांच्या आकारात बदल होत नाहीत. हे साधेच तंत्रज्ञान आहे, फक्त वेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ७ मजली २०० इमारती अशा तंत्रज्ञानाने बांधण्यात आल्या आहेत.या तंत्रज्ञानाच्या कामांसाठी खर्चदेखील कमी येतो तसेच काम वेगाने होते. काँक्रिटच्या कामांमध्ये एक महिन्यात एक मजला होतो. यामध्ये पाच दिवसांत एक मजला पूर्ण होतो. लातूरच्या मानाने माळीणचे आपत्ती व्यवस्थापन छोटे असले तरी माळीणच्या पुनर्वसनासाठी खूप लोक एकत्र येऊन जलद गतीने काम करत आहेत. प्रत्येक घराला पाणी, बसस्टॅण्ड, दुकाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा तसेच मुख्य रस्ता ९ मीटरचा तर अंतर्गत रस्ते ६ मीटरचे केले जाणार आहेत.