शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

बारामतीत शेतकरी शेतातच अनुभवणार आधुनिक शेती तंत्रज्ञान

By admin | Updated: January 10, 2017 02:38 IST

प्रत्यक्ष ११० एकरांवर प्रयोग केलेले ‘कृषिक’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शन बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषिविज्ञान

बारामती : प्रत्यक्ष ११० एकरांवर प्रयोग केलेले ‘कृषिक’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शन बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषिविज्ञान केंद्राच्या मार्फत होणार आहे. या प्रदर्शनात सौरऊर्जेसह कमी पाण्यावर शेती, कमी खर्चाची शेती, फळबाग लागवड यांसह दुग्ध-उत्पादन, फळप्रक्रिया, कृषी पर्यटन आदींच्या प्रात्यक्षिकांसह प्रदर्शन होणार आहे. थेट शेतातच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. या प्रदर्शनाचा उपयोग महिला शेतकऱ्यांनी अधिकाधिक घ्यावा, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संयोजक राजेंद्र पवार यांनी सांगितले. या संदर्भात पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की काही वर्षांपासून ‘कृषिक’ प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. राज्यभरातील तीन ते साडेतीन लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होतात. अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी तंत्रज्ञान पाहून त्यांच्या शेती पद्धतीत बदल केला आहे. ग्रामीण भागात शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. यंदा महिला शेतकऱ्यांना अधिक वाव कसा मिळेल, यासाठी सुरुवातीचे दोन दिवस महिला शेतकऱ्यांसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या ठराविक शेतकऱ्यांना मार्गदर्शन या प्रदर्शनात केले जाणार आहे. दि. १९ ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित या कृषी प्रदर्शनात कृषी खाते, नाबार्ड, आत्मासह खासगी कृषी कंपन्यांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी विकास प्रतिष्ठानच्या ११० एकरांवर प्रत्येकी १० गुंठ्यांच्या ९० प्लॉटवर नवीन तंत्रज्ञानावर आधारित कृषीविषयक प्रयोग केले आहेत. त्याचबरोबर, फळबागांमध्येदेखील त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनात भाजीपाला, फळबाग, पशुपक्षी व्यवस्थापन, स्वयंचलित खत प्रणाली, चारापिके, पॉली हाऊस, फळप्रक्रिया, बीजप्रक्रिया, कृषी पर्यटन, अवर्षणप्रवण भागात यशस्वी ठरलेली शेततळी प्रयोग, कमी पाण्याचा वापर करून चांगली शेती करण्याची पद्धत, शेती तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. साधारणत: राज्यभरात उसाच्या पिकाला महत्त्व दिले जाते. नैसर्गिक अपत्तीच्या काळात पाणी कमी मिळते. त्यामुळे उसाचे पीक कमी पाण्यात कसे घेता येईल, त्याचबरोबर उसाबरोबर आंतरपीक घेणे याचाही अनुभव शेतकऱ्यांना घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.या प्रदर्शनात खिलार, गीर, सहिवाल, थारपारकर, देवनी, लालकंदारी या गोवंशांचेदेखील महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्याचबरोबर पशुधन वाचविण्यासाठी मूरघास, हायडोपोनिक्स, चारापिके तंत्रज्ञानदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कृषिविज्ञान केंद्राच्या माध्यमातून आंबा, पेरू, चिकू, डाळिंब, कडधान्य, तेलबिया व धान्य पिकांच्या रोपांची, बियाण्यांची उत्पादने घेतली जातात. त्याचबरोबर नेदरलँड्स सरकारच्या सहकार्याने ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन व्हेजिटेबल’ हा प्रकल्पदेखील कार्यरत आहे. यासह भाजीपाला गुणवत्ता केंद्र आदींची माहिती उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)