शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा बॅनर लागला; मराठीहृदयसम्राटच्या जागी नवी उपाधी; बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 08:56 IST

आधी राज ठाकरेंच्या नावापुढे मराठी हृदयसम्राट उपाधी लागायची; आता मराठी हृदयसम्राटची जागा नव्या उपाधीनं घेतली आहे

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर मराठी भाषेचा, भूमिपुत्रांचा विषय हाती घेणाऱ्या राज ठाकरेंचा प्रवास आता आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू झाला आहे. मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा त्यांच्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज यांनी राज्य सरकारला दिला. मुंबई, ठाण्यात राज यांच्या सभा झाल्या. आता राज ठाकरे पुण्यात जाणार आहेत. उद्या हनुमान जयंतीनिमित्त राज यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

पुण्यातल्या खालकर मारुती चौकात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होईल. या कार्यक्रमाचं पोस्टर मनसेकडून तयार करण्यात आलं आहे. त्यावर राज यांचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. राज यांच्या नावापुढे लावण्यात आलेली ही उपाधी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

पुढच्या महिन्याच्या सुरुवातील ईद आहे. ३ मे रोजी देशभरात ईद साजरी होईल. राज यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा राज यांनी दिला आहे.

राज यांनी हाती घेतलेल्या नव्या मिशनची सुरुवात उद्या पुण्यातून होईल. खालकर मारुती चौकात राज यांच्या हस्ते महाआरती होईल. सामुदायिक हनुमान चालिसा पठण करण्यात येईल. या भागात जवळपास कोणतीही मशीद नाहीए. मात्र राज यांच्या हस्ते होणारी महाआरती बदलत्या राजकीय वातावरणाचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.

राज यांचं बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल?शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस हे विषय हाती घेतले. दाक्षिणात्य नागरिकांविरोधात हटाव लुंगी आंदोलन सुरू केलं. भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे पक्षाला यशही मिळालं. मात्र ते मर्यादित स्वरुपाचं होतं. यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट उपाधी वापरली जाऊ लागली. आता राज यांचा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. हिंदूहृदयसम्राट या उपाधीशी साधर्म्य असलेली हिंदूजननायक उपाधी त्यांच्या नावासमोर लावण्यात आलेली आहे. मराठी हृदयसम्राट ते हिंदूजननायक हा प्रवास राज यांना नेमका कुठे घेऊन जाणार, ते भविष्यात स्पष्ट होईल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे