शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची परतफेड ! पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 22:02 IST

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

ठळक मुद्देवर्षभर पश्चिम महाराष्ट्रात केले काम 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महिला अध्यक्षा रुपाली पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या अगोदर मनसेने आपला महिला उमेदवार मैदानात उतरून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. 

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावरून कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत नाराजी उमटली होती. त्यानंतर, पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन पदवीधर मतदार संघात लढण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदार नोंदणी जोरदार सुरू करण्यात आली आहे. मनसे या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत नव्हती. परंतु, शनिवारी पाटील यांची उमेदवारी घोषित करून मनसेने आव्हान निर्माण केले आहे. पदवीधरसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे विभागाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उर्वरित विभागांची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. ------रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्तीचा सन्मानमी मागील वर्षभरापासून पश्चिम महाराष्ट्रात काम करीत आहे. जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे काम केल्यामुळे उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आभारी आहे.- ऍड. रुपाली पाटील, उमेदवार, मनसे

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेElectionनिवडणूक