शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचा धुमाकूळ; उत्तर भारतीय चहा, पाणीपुरीवाल्यांची दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 18:22 IST

फेरीवाल्यांविरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. बुधवारी कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देगुरूवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागांत फेरीवाल्यांवर केले हल्लेमनसेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची करण्यात आली होती मागणी

पुणे : फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. . त्यांचे स्टॉल आणि दुकाने यांची तोडफोड केली. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून अचानक फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गट करून शहरातील विविध भागांत पाठविण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला. 

सिंहगड रोड परिसरातही अनेक फळे आणि भाजीपाल्यांचे स्टॉल मनसेच्य कार्यकर्त्यांनी उधळून लावले. यामध्ये विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. त्यांचे स्टॉल तोडण्यात आले. सावलीसाठी लावण्यात आलेल्या छत्र्याही मोडून टाकण्यात आल्या. पोलिसांना या प्रकाराची कल्पनाच नव्हती. त्यामुळे बराच वेळ हा प्रकार सुरू होता. 

मुंबईतील एलिफिन्स्टिन पुलाच्या दुर्घटनेनंतर मनसेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी पंधरा दिवसांचे अल्टीमेटमही देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतही फेरीवाल्यांविरोधात आंदोलने करण्यात आली होती. पुण्यात मनसेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज अगदी गनिमी कावा पध्दतीने आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाagitationआंदोलनhawkersफेरीवाले