शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

PMC: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनील टिंगरे यांनी आणला हक्कभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:08 IST

विकास कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने होणार कारवाई

येरवडा : वारंवार पाठपुरावा करूनही विविध विकास कामांसाठी "ना हरकत प्रमाणपत्र" न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. आता या प्रकरणी विधी मंडळ सचिवायलयाने संबधित अधिकाऱ्यांना नोटीसा बजाविल्या आहेत.               वडगावशेरी मतदारसंघातील विविध झोपडपट्ट्या आणि दलित वस्तीमध्ये दिड कोटी रुपयांची विविध विकासकामे आमदार टिंगरे यांनी त्यांच्या "आमदारनिधी"तून सुचविली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने झोपडपट्टीमधील ही कामे करण्यासाठी महापालिकेचे "ना हरकत पत्र" मागविले होते. त्यानुसार आमदार टिंगरे यांनी नगर रस्ता आणि येरवडा क्षेत्रिय कार्यालयाच्या संबधित अधिकाऱ्यांकडे या कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात दि. 6 जानेवारीला जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकार्यांची बैठक झाली. त्यात दोन दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले होते.  त्यानंतर दि. 12 जानेवारीला आमदार टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन ना हरकत पत्राची मागणी केली होती.  मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही ना हरकत  पत्र मिळाले नाही. जिल्हाधिकारी यांनी देखील महापालिकेला दोन वेळा स्मरणपत्र पाठविले होते. त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. 

विकास कामांसाठी "ना हरकत प्रमाणपत्र" न देऊन जाणीवपूर्वक अडथळा

अखेर मार्च अखेरीस या कामांसाठी देण्यात आलेला निधी रद्द  (लॅप्स) होण्याची वेळ आली. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी या प्रकरणी विधी मंडळाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली. त्यात त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांनी विकास कामांसाठी "ना हरकत प्रमाणपत्र" न देऊन विकास कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा आणला. अशा प्रकारे लोकप्रतिनिधीना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास देऊन संबधित अधिकार्यांनी अवमान केला असल्याने त्यांच्यावर हक्क भंग आणण्याची मागणी केली. त्यानुसार  विधीमंडळ सचिवालयाने नगररस्ता क्षेत्रिय सहायक आयुक्त सुहास जगताप, येरवडा क्षेत्रिय सहायक आयुक्त वैभव कडलख, डीपीडीसीचे समन्वय अधिकारी उंडे आणि क्षेत्रिय कार्यालयाचे संबधित उप अभियंता आणि शाखा अभियंता यांना विशेषा अधिकार भंग आणि अवमान नोटीस बजावली असून त्यावर खुलासा मागविला आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMLAआमदारYerwadaयेरवडाcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त