शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीवर आमदार स्टिकरप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:18 IST

महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष किसन भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत, त्या आमदारांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले, याचीही माहिती घेण्यास शिक्रापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे.

शिक्रापूर - महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष किसन भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिलेत, त्या आमदारांनी असे किती आणि कुणाकुणाला स्टिकर वाटले, याचीही माहिती घेण्यास शिक्रापूर पोलिसांनी सुरुवात केली आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची पुणे जिल्ह्यातील पहिली घटना आहे.काही दिवसांमध्ये खेड तालुक्यात महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावून अनेक गाड्या फिरत होत्या. शिरूर तालुक्यात अशा पद्धतीने (एमएच १२ एमएफ ००४७) या क्रमांकाची मोटार फिरत असल्याचे निदर्शनास आले.पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी बेकायदा स्टिकर लावून फिरत असलेले गोरक्ष भुजबळ यांना ताब्यात घेतले.भुजबळ हे सणसवाडीच्या माजी सरपंच गीता भुजबळ यांचे पती आहेत. त्यांच्यावर भारताचीराजमुद्रा अयोग्य वापरास प्रबंध कायदा २००५ कलम ४ व ७ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक गिरीगोसावी यांनी दिली.पोलिसांनी ही मोटार ताब्यात घेतली आहे. ही मोटार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काही दिवस वापरण्यासाठी घेतली होती. त्यांनीच मोटारीला स्टिकर लावल्याची माहिती गोरक्ष भुजबळ यांनी दिली. आमदारांसाठी असलेले स्टिकर नेमके कुणी वाटले आणि किती वाटले, याची नेमकी माहिती संकलित करण्याचे कामही सुरू केल्याचे गिरीगोसावी यांनी सांगितले.याबाबत पोलीस नाईक तेजस रासकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देविदास दगडे हे करीत आहे.

टॅग्स :MLAआमदारnewsबातम्या