शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

PDCC Bank Election: आमदार दिलीप मोहिते जिल्हा बँकेवर जाणार बिनविरोध; शरद बुट्टे पाटलांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:33 IST

जिल्हा बँकेच्या खेड शाखेत आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माघारी बाबतची माहिती दिली...

राजगुरूनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील सोसायटी अ गटातून जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी माघार घेतली. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (dilip mohite) यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.

अर्ज माघारीनंतर जिल्हा बँकेच्या खेड शाखेत आमदार दिलीप मोहिते व शरद बुट्टे पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माघारी बाबतची माहिती दिली. सन २००५ मध्ये झालेल्या आरोपावरून आमदार मोहिते यांनी शरद बुट्टे पाटील यांच्या विरोधात येथील जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोणत्याही अटी, शर्ती शिवाय मोहिते यांनी हा खटला मागे घेतला. त्यावरून तडजोडी होऊन शरद बुट्टे पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला असे यावेळी सांगितले.

बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण टोपे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये यशस्वी मध्यस्थी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बुट्टे पाटील आणि आम्ही एकत्रित पणे समाजकारण केले आहे. त्यांचा जनसंपर्क आणि विकास कामे करण्याची हातोटी, चिकाटी व प्रामाणिकपणा यावरून त्यांना नजीकच्या काळात मोठ्या पदाची संधी मिळेल. तर आपण राजकीय एक्झिट घेण्याच्या पवित्र्यात असताना कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद मागे ठेवायचा नाही असे ठरवले आहे, असे आमदार मोहिते म्हणाले.

राष्ट्रवादीचे हिरामण सातकर यांचा अर्ज या गटात आहे. मात्र तो माघारीच्या अंतिम दिवशी माघार होणार आहे. यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी कृषी सभापती अरुण चांभारे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील देवकर, माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शिवाजी डावरे, युवानेते मयूर मोहिते, सचिन लांडगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbankबँकElectionनिवडणूक