शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पोल्ट्री व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 21:58 IST

डॉक्टरांनी आपल्या शवविच्छेदन अहवालात मृतदेह डिकंपोज झाल्याने नेमके कारण सांगता येत नसल्याचे म्हटले आहे़. 

ठळक मुद्देशनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृतदेह खडकवासला धरणाच्या चौपाटीला त्यांच्याच गाडीत आढळून आला़शवविच्छेदनात मृतदेह डिकंपोज झाल्याने मृत्युचे नेमके कारण सांगता येत नाही, असे ससूनच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

पुणे : दोन दिवसापूर्वी घरातून मित्राबरोबर बाहेर पडलेले पोल्टी व्यावसायिक डॉक्टरांचा मृतदेह मोटारीत सापडला असून त्यांच्या शवविच्छेदनातही त्यांच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने गुढ वाढले आहे़. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून तो रासायनिक पृथक्करणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे़. डॉ़ किशोर देवीदार शेडगे (वय ४७, रा़ गणेश नभांगण सोसायटी, रायकरनगर, धायरी) असे त्यांचे नाव आहे़.ते ८ मार्चला दुपारी आपल्या मोटारीतून मित्राबरोबर निघून गेले होते़. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचा मृतदेह खडकवासला धरणाच्या चौपाटीला त्यांच्याच गाडीत आढळून आला़.पोलिसांनी तो शवविच्छेदनाला पाठविला़. त्यात मृतदेह डिकंपोज झाल्याने नेमके कारण सांगता येत नसल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात म्हटले आहे़. याबाबतची माहिती अशी, डॉ़ किशोर शेडगे हे व्हॅटनरी डॉक्टर असून त्यांचा कोंबडीची छोटी पिल्ले विकण्याचा व्यवसाय आहे़. साई सुरभी या कंपनीमार्फत ते हैदराबादहून कोंबड्यांची पिल्ले आणून ती येथील शेतकऱ्यांना विकत असत़. ते मुळचे यवतमाळचे असून गेल्या ९ वर्षांपासून धायरीत राहत आहे़. त्यांचा पत्नी व दोन मुले असा परिवार आहे़. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते़. त्यावरुन त्यांचे पत्नीशी वादही होत असत़. ८ मार्चला दुपारी बारा वाजता ते घरातून बाहेर पडले़. त्यानंतर दीड वाजता परत सोसायटीत येऊन मित्रासह मोटार घेऊन ते निघून गेले़ घरी न परतल्याने त्यांची पत्नी श्रद्धा शेडगे यांनी रात्री ११ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन करुन संपर्क साधला़ तेव्हा त्यांनी आपण मित्र सागर ठाकर यांच्याबरोबर पानशेत येथील धनगर वस्तीत असल्याचे सांगितले़.त्यानंतरही ते घरी आले नाही व त्यांचा मोबाईलही बंद लागत होता़. शेवटी दुसऱ्या दिवशी ९ मार्चला त्यांच्या पत्नीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली़ .त्यानंतर शनिवारी रात्री हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वायकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड आणि इतर कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना खडकवासला धरणाजवळच्या चौपाटीपासून थोड्या अंतरावर पुढे एक पांढऱ्या रंगाची हुंदाई मोटार उभी असलेली आढळून आली.शहानिशा करण्यासाठी पोलीस मोटारीजवळ गेले. मात्र , आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मोटार लॉक केलेली नव्हती़. मागच्या सीटवर एक व्यक्ती होती़ पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले़. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले़ मोटारीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी डॉ़ किशोर शेडगे यांची माहिती मिळाली़.हवेली पोलीस त्यांच्या मित्रांचा शोध घेत असून शवविच्छेदनात मृतदेह डिकंपोज झाल्याने मृत्युचे नेमके कारण सांगता येत नाही, असे ससूनच्या डॉक्टरांनी म्हटले असून व्हिसेरा रासायनिक पृथक्करणासाठी पाठविण्यात आला आहे़.डॉ़ शेडगे हे ८ मार्चला रात्री अकरा वाजेपर्यंत व्यवस्थित होते़. त्यानंतर एकाच दिवसात त्यांचा मृतदेह इतका लवकर डिकंपोज कसा झाला़. त्यांना दारूचे व्यसन होते़ मग, त्यांचा मृत्यु नेमका कसा व कधी झाला, याची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत़ हवेली पोलीस अधिक तपास करीत आहेत़ 

 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलPolice Stationपोलीस ठाणे