शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; आंदोलनासाठी 'भाऊ' चढले 'टॉवर'वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 10:31 IST

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील घटना

उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या संदर्भात तसेच इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल गवळी यांनी आज सकाळी गावातील बीएसएनएलच्या टाॅवरवरती चढून आंदोलनाला सुरवात केली आहे..

गवळी म्हणाले,गायरान क्षेत्रावर झालेले अतिक्रमण तसेच गावठाण रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत गवळी यांनी वारंवार तक्रारी अर्ज केले होते.त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ठराव होऊनही अद्यापही अतिक्रमणे काढली गेली नाहीत. ग्रामपंचायत बऱ्हाणपूर येथील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत,घरकुल योजनेमध्ये घरे पुर्ण झालेली आहेत असे दाखवून शासनाची ग्रामपंचायतीने फसवणुक केली असल्याचा आरोप देखील गवळी यांनी केला आहे.त्याच बरोबर अतिक्रमण करणाऱ्यांना हाताशी धरून माझेवर खोटे गुन्हे दाखल करून स्वत: केलेला भ्रष्टाचार दाबत आहे.

ग्रामपंचायतीच्या अंतर्गत निष्काळजीपणे झालेल्या कामामुळे १० वर्षापुर्वी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार देखील दाबण्यात आलेला आहे.आणि मी वारंवार तक्रारी करीत असल्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच विनाकारणाने खोटे गुन्हे दाखल केलेल्या सर्व गुन्हयांची पुन्हा चौकशी करण्यात यावी.

एका ठिकाणी रस्ते मंजूर असताना ते रस्ते त्याठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी केलेले आहे.शासकीय काम पुर्ण झाल्यानंतर शासकीय फलक लावणे बंधनकारक असताना कोणत्याही कामाचे शासकीय फलक त्याठिकाणी लावण्यात आलेले नाहीत.शासनाकडूनमिळालेले ग्रंथालय,भांडी, लाऊडस्पीकर व इतर वस्तु वारंवार चोरीला गेले असून त्याबाबत विचारणा केली असता त्याबाबत ग्रामपंचायतसुध्दा तक्रार देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत.गेली १० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सर्व कारभारची चौकशी करण्यात यावी.

या सर्व मागण्यांकरीता अनिल भानुदास गवळी यांनी आज सकाळी गावातील टाॅवरवर चढून आदोलनाला सुरवात केली आहे.या माहितीसाठी गटविकास अधिकारी राहूल काळभोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Baramatiबारामतीgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलन