शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार! ब्रेन डेड रुग्णास जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:51 IST

दोन मेंदू मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.  रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा संघाने वेळेत व प्रभावी शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्ण पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. 

ठळक मुद्देदोन्ही प्रकरणांमध्ये त्वरित आणि परिणामकारक शस्त्रक्रियेने दोन मौल्यवान जीव बचावले.आपत्कालीन स्थितीत रुग्णाचा जीव वाचविणे अधिक महत्त्वाचे असते.

पुणे : रुग्णांचा जीव वाचविण्याची क्षमता असल्यानेच अनेकदा डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. पुण्यातील दोन कुटुंबांसाठी हे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध झाले आणि दोन मेंदू मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.  रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा संघाने वेळेत व प्रभावी शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्ण पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या प्रकरणात ३५ वर्षीय सुनयना भाटिया या महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कोलंबिया आशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यामुळे त्यांच्यावर कार्डिओपल्मनरी रिझसिटेशन (सीपीआर) सादर करण्यात आले. रुग्णालयाच्या आणिबाणी केंद्रात दाखल होण्याच्या काही मिनिटांत रुग्णावर शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली.  तत्काळ रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती घेण्यात आली. डॉ. प्रवीण सुरवसे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संमती मिळताच शस्त्रक्रिया सुरु केली.रुग्णाची स्थिती आणि प्रकरणाची गंभीरता समजावून सांगताना कोलंबिया आशिया हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोसर्जनचे डॉ. प्रवीण सुरवशे म्हणाले, जेव्हा आम्ही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नेले होते तेव्हा रुग्ण जवळजवळ ब्रेनडेड होते. आणिबाणीच्या सीपीआरने हृदय व मेंदूमध्ये रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत झाली. ज्यामुळे पुढील निदानासाठी आम्हाला मौल्यवान वेळ मिळाला. त्यांच्या मेंदूमध्ये हायड्रॉसेफायल्ससह विशाल ट्यूमर असल्याचे सीटी स्कॅनने समोर आले.  अशावेळी मेंदूच्या रिकाम्या भागात ट्यूमर तयार होतो, ज्यामुळे मेंदूच्या कायार्साठी आवश्यक द्रव पोहोचण्यास अडथळे निर्माण होतात. सीएसएफ द्रव मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो.  सीएसएफचा एकाच ठिकाणी संचय होण्यामुळे मेंदूवरील दबाव वाढतो ज्यामुळे मेंदूचे कायमचे नुकसान होऊ शकते.  शस्त्रक्रियेमुळे स्मृती कमी होणे किंवा अर्धांगवायू होऊ शकण्याची जोखीम असूनही आम्ही लगेचच ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी मेंदू मृत झालेल्या रुग्णावर तत्काळ यशस्वी शस्त्रकिया केली. १० ते १५ मिनिटांचा आणखी उशीर झाला असता तर रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला असता. साधारणपणे प्रकाशाला प्रतिक्रिया देताना कोणत्याही व्यक्तीचे मानवी डोळे विस्फारतात किंवा उघडझाप करतात. तथापी उजेडात जाउनही डोळे प्रतिक्रिया देतात मात्र उघडझाप करीत नाहीत हे मेंदूच्या मृत्यूचे स्पष्ट लक्षण आहे. जसे की या प्रकरणात रुग्णाला हळूहळू ह्रदयविकाराचा आणि श्वासोच्छवासाच्या झटक्याचा सामना करावा लागला होता. ८ तास प्रदीर्घ चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी ट्यूमरला आजूबाजूच्या मेंदूला कोणतीही हानी न होता यशस्वीरित्या काढले. रुग्णाला त्याची स्मरणशक्ती, भाषण आणि इतर मेंदूच्या कार्यपद्धतीसह पूर्णपणे चैतन्य आणि सामान्य द्नान दुसर्‍या दिवशी पुन्हा प्राप्त झाले.  रुग्णाचे नातेवाईक तिला परत पाहून अतिशय आनंदी होते. आठ दिवसांनंतर रुग्ण कोणत्याही न्यूरोलॉजिकल अडचणीशिवाय चालत घरी गेला.दुसºया एका स्वतंत्र प्रकरणात डॉ. प्रवीण सुरवसे यांनी आर्शन झोयाब उस्मानी या २१ वर्षाच्या तरुण मुलाला वाचविले. रस्ता अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णाचा मेंदू जवळजवळ मृतावस्थेत होता व जगण्याची शक्यता ५ टक्के पेक्षा कमी होती. पालकांकडून योग्य संमती प्राप्त झाल्यानंतर सुरवसे आणि त्याच्या टीमने रुग्णावर तत्काळ यशस्वी शस्त्रक्रिया केली.या प्रकरणाची माहिती देताना सुरवसे म्हणाले, की रुग्णाला आमच्याकडे आणले तेव्हा त्याचा मेंदू मृत झाला होता. तो मेंदूच्या उजवीकडून होणाºया रक्तस्रावाशी झुंज देत होता.  डोक्याच्या कवटीमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे अंतर्गत रक्तवाहिनीची गाठ झाली होती. ज्यामुळे मेंदूवर दबाव वाढून कायमस्वरूपी नुकसान होऊन रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती.  रुग्णाला रुग्णालयात आणल्यानंतर इमर्जन्सी शस्त्रक्रिया त्वरीत आणि पद्धतशीररित्या करुन २० मिनिटांच्या आत गाठ काढून टाकण्यात आली. या प्रकरणात वेळेचा अंदाजे महत्त्व होता.  कारण प्रत्येक सेकंदाला अधिक विलंब झाल्याने हजारो न्यूरॉन्सच्या मृत्यू होऊन रुग्ण वाचण्याची शक्यता कमी झाली असती.शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पालक आणि नातेवाईक उत्साहित होते व त्यांनी रुग्णाचा दुसरा जन्म झाल्याचे सांगितले. कोणत्याही न्यूरोलॉजिकल डिफेक्टशिवाय रुग्णाला तिसर्‍या दिवशी शुद्ध आली. त्याची स्मरणशक्ती व्यवस्थित होती व त्याने लगेच आपल्या आई-वडिलांना ओळखले.आम्ही आपल्या मुलाच्या जीवनाचा बचाव करण्यासाठी कोलंबिया आशिया हॉस्पिटलमधील डॉ. सुरवसे आणि त्यांच्या टीमचे आभारी आहोत. माझ्या कुटुंबाच्या  निराशाजनक क्षणांच्या काळात डॉ. सुरवसे आणि त्यांच्या टीमने आमची आशा जिवंत ठेवली.  त्यांचे कौशल्य आणि तत्काळ हस्तक्षेप करण्यामुळेच आज माझा मुलगा जिवंत आहे. ज्यामुळे हॉस्पिटलच्या उपचारावरील आमचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. त्यांनी रुग्ण आणि माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत , असे रुग्णाच्या वडिलांनी सांगितले.दोन्ही प्रकरणांमध्ये त्वरित आणि परिणामकारक शस्त्रक्रियेने दोन मौल्यवान जीव बचावले. नियोजनपूर्वक यशस्वी करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळेच संबंधित कुटुंबांच्या जीवनात आनंद आला. आपत्कालीन औषध विभागाने दोन्ही रुग्णांना त्वरेने व्यवस्थापित केले जेणेकरुन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेऊन तत्काळ शल्यक्रिया करता आली, अशी माहिती कोलंबिया आशिया हॉस्पिटलचे इमर्जन्सी मेडिसीन डिपार्टमेंटचे डॉ. रवी प्रताप यांनी दिली.आपत्कालीन स्थितीत रुग्णाचा जीव वाचविणे अधिक महत्त्वाचे असते. अशा आपत्कालीन प्रवेशासाठी प्रवेश आणि अर्ज भरण्याची औपचारिकता प्रवेशादरम्यान अनिवार्य करण्यात आलेली नाही. प्रशासकीय मुद्यांबाबत त्रास न देता डॉक्टरांना स्वातंत्र्य दिल्यानेच त्वरित आणि जलद वैद्यकीय निर्णय घेणे, वेळेवर हस्तक्षेप सुनिश्चित करुन शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना अनुकूल धोरणे राबवून रुग्णांचे जीव वाचविण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतात.

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणेdocterडॉक्टर