शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अव्वल..! गौण खनिजाची पुणे जिल्ह्यात विक्रमी ३१९ कोटी ५७ लाखांची वसुली

By नितीन चौधरी | Updated: April 9, 2025 09:37 IST

खानपट्टाधारकांनी गौण खनिजाचे उत्खनन केल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी घेण्यात येते

पुणे : गौण खनिजावरील रॉयल्टी वसुलीत पुणे जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. पुणे रायगड आणि ठाणे जिल्ह्याला या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी ३०० कोटींच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात पुणे जिल्ह्याने बाजी मारत उद्दीष्टापेक्षा सुमारे १९ कोटी रुपयांचा जादा महसूल गोळा केला आहे. गेल्या वर्षीही जिल्ह्याने २८० कोटी रुपयांची रॉयल्टी गोळा केली होती.

राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला प्रत्येक वर्षी गाैण खनिजावर स्वामित्वधन वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. संबंधित उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक वर्षी प्रयत्न करते. त्यासाठी जिल्ह्यातील दगड खदानींसह वाळू घाटांचा लिलाव करण्यात येताे, तर मुरूम व इतर गाैण खनिजांच्या खदानींचा लिलाव करून महसूल गाेळा करण्यात येताे.

या व्यतिरीक्त खानपट्टाधारकांनी गौण खनिजाचे उत्खनन केल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी घेण्यात येते. ही रॉयल्टी भरल्यानंतर वाहतूकदार गौण खनिजची वैधरीत्या वाहतूक करू शकतो.

राज्य सरकारने पुणे, रायगड व ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक प्रत्येकी ३०० रुपयांचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार यंदा ३१ मार्चअखेर जिल्ह्याने ३१९ कोटी ५७ लाख रुपयांची रॉयल्टी गोळा केली आहे. एकूण उद्दिष्टाच्या ही वसुली तब्बल १९ कोटी ५७ लाख रुपयांनी, तसेच ६ टक्क्यांनी अधिक आहे.

सर्वाधिक वसुली मार्च महिन्यात ४२ कोटी ९९ लाख ७५ हजार १३० रुपयांची झाली आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग (पूर्व, उत्तर व दक्षिण), तसेच जिल्हा परिषदेकडील समायोजित २८ कोटी ८३ लाख ९८ हजार ३१६ रुपयांची रक्कम वसूल झाली आहे. राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी गौण खनिजाच्या उत्खननातून मिळणाऱ्या रॉयल्टीचे जिल्ह्यासाठीचे उद्दीष्ट २८० कोटी रुपये दिले होते.

राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १९ कोटी रुपयांची अधिकची वसुली झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार वसुलीसाठी गेल्या तीन महिन्यांत केलेल्या प्रयत्नांनुसार वसुली उद्दिष्टापेक्षा जास्त झाली आहे.  - सुयोग जगताप, जिल्हा खनिकर्म अधिकारी

महिनानिहाय वसुली

एप्रिल २०२४--२० कोटी ६० लाखमे २०२४--२० कोटी ६८

जून २०२४--२० कोटी ७५जुलै २०२४--१७ कोटी ३ लाख

ऑगस्ट २०२४--२४ कोटी ८१ लाखसप्टेंबर २०२४--२८ कोटी ३५ लाख

ऑक्टोबर २०२४--१७ कोटी ५ लाखनोव्हेंबर २०२४--१७ कोटी १४ लाख

डिसेंबर २०२४--२५ कोटी ६३ लाखजानेवारी २०२५--२७ कोटी ४९ लाख

फेब्रुवारी २०२५--२८ कोटी १४ लाखमार्च २०२५--४२ कोटी ९९ लाख

एकूण ३१९ कोटी ५७ लाख

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकार