शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात कर्जाऊ रकमेसाठी पुतण्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:38 IST

व्यवसायासाठी घेतलेले २ लाख रुपये परत करत नाही. त्यामुळे येरवड्यात थेट पुतण्याचे अपहरण करण्यात आले.

ठळक मुद्देयेरवडा पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची सुटका, तिघांना अटक 

विमाननगर : कर्जाऊ घेतलेली रक्कम परत करत नाहीत या कारणासाठी कर्जदाराच्या अल्पवयीन पुतण्याचे अपहरण करून त्याला पळवून नेल्याची घटना मंगळवारी(दि.१२जुलै) रात्री येरवड्यात घडली आहे. किसन धोंडिबा जाधव (वय ५०, रा. डॉ. आंबेडकर हाउसिंग सोसायटी, येरवडा)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक असून त्यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.विशाल दत्तात्रय ढोले(वय २५ रा.सणसवाडी शिक्रापूर), स्वप्नील शांताराम तांबे (वय २५ रा. गणेगाव वरुडे, शिरूर) सचिन बंडू थिटे (रा. सणसवाडी शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,विशाल ढोले यांचा भाऊ निखिल ढोले यांच्याकडून किसन जाधव यांनी दोन लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते .या कर्जाऊ रकमेसाठी ढोले यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता . मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास किसन यांचा सतरा वर्षांचा पुतण्या घराबाहेर फिरत असताना त्याला आरोपींनी बोलावून घेतले. एका चारचाकी गाडीत बसवत त्याला पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत पुतण्या घरी न आल्यामुळे जाधव यांनी याची माहिती येरवडा पोलिसांना दिली .येरवडा पोलिसांनी याप्रकरणी सीडीआर व तपास पथकामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली .या तिघांनी सदरच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून टाटा गार्ड रूम येथे त्याला लपवून ठेवले असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट ,पोलीस हवालदार हरिश्चंद्र मोरे, हनुमंत जाधव यांच्या पथकाने अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली. तिघाही आरोपींना चारचाकी झेन कार (एमएच ०२ पीए ९५१६) सह ताब्यात घेण्यात आले .अधिक तपासात त्यांनी अल्पवयीन बालकाचे कर्जाऊ रक्कम परत न केल्यामुळे अपहरण केल्याचे कबूल केले. याप्रकरणी येरवडा पोलीस गुन्हयाचा पुढईल तपास करत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाYerwadaयेरवडाKidnappingअपहरणPoliceपोलिस