शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातल्या टेकड्यांवर करा मिनी ट्रीप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 15:51 IST

पुणे शहरात अनेक टेकड्या आहे. मुलांच्या सुट्ट्यांमध्ये कमी वेळात ट्रीप करायची असेल तर हा पर्याय ट्राय करा.यामुळे शरीराचा व्यायाम तर होईलच पण शहराचा भूगोल समजण्याशी मदत होईल. 

 

पुणे : ज्या शहरात नदी आणि टेकड्या आहेत ते शहर भौगोलिकदृष्टीने परिपूर्ण मानले जाते. पुणे शहराचा यात समावेश होत असून काही तासांची मिनी ट्रीप करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे काही तासांचा रिफ्रेश करणारा ब्रेक हवा असेल तर टेकड्यांवर नक्की जा. 

वेताळ टेकडी :

पुण्यात पौड रस्त्यावर असणारी वेताळ टेकडी एआरएआय टेकडीच्या नावानेही ओळखली जाते. साधारण २६०० फूट उंचीवर असणारी ही टेकडी शहरातील सर्वात उंचीवरचे ठिकाण मानले जाते. इथे अनेक दुर्मिळ पक्षीही बघायला मिळतात. सकाळी सूर्योदयाची वेळ ही या ठिकाणी जाण्याची सर्वोत्तम वेळ आहे. इथे जाताना घरून डबे घेऊन गेल्यास तीन-चार तासाची  रिफ्रेश करणारी ट्रीपही होऊ शकते. 

बाणेर टेकडी :

बाणेर आणि पाषाण गावांना विभागण्याचे काम बाणेर येथील टेकडी करते. २२२४ फूट उंचीवर असलेली ही टेकडी शहरातील उंचीच्या दृष्टीने तिसऱ्या स्थानावर आहे. या टेकडीवर जाण्यासाठी तब्बल पाच रस्ते असून इथले तापमान हिरवळीमुळे शहरापेक्षा कायम १ ते २ अंशांनी कमी असते. आल्हाददायक हवा आणि निसर्गसौंदयाने नटलेला हा भाग मनाला नवा तजेला देतो. 

पर्वती :

हे पुण्यातले प्रसिद्ध ठिकाण असून इथे सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची कायम गर्दी असते. पर्वतीची उंची साधारण २१०० फूट आहे. पर्वतीला एकूण १०३ पायऱ्या आहेत. पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल- रुक्मिणी  आदी मंदिरे आहेत. आबाल-वृद्ध असेही कोणीही पर्वती सहज चढू शकतात. 

 

चतुःशृंगी टेकडी :

सेनापती बापट रस्त्याकडून विद्यापीठ रस्त्याकडे जाताना असणारे चतुःशृंगी मंदिर टेकडीवर वसलेले आहे. ही टेकडी बाणेर टेकडीला जोडलेली असून काही तासांच्या सहलीसाठी चांगला पर्याय आहे. मंदिराच्या बाजूने पायऱ्यांनी न चढता थेट टेकडी चढायला सुरुवात केली असता वरपर्यंत चालत जाण्याची सोय आहे. इथे व्यायामप्रेमींची गर्दी असते.  

तळजाई टेकडी :

पुण्यात हिरवळ शिल्लक असलेल्या भागापैकी असलेली तळजाई टेकडी. टेकडीच्या वरपर्यंत जाण्यास रस्ता असून तिथे फिरायला येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. या ठिकाणी फिरण्यास ५ ते १० आणि संध्याकाळी ४. ३० ते ७ परवानगी आहे. या टेकडीवर तळजाईचे मंदिर आहे.इथे अनेक पक्षी बघायला मिळत असून हे पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण आहे.

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेchatushrungi templeचतु:श्रृंगी मंदीरBanerबाणेर