शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

नकार पचविण्याची मानसिकता हरवतेय!

By admin | Updated: April 9, 2017 04:35 IST

तंत्रज्ञानाच्या युगात संवाद कमी होत असतानाच युवा पिढीतील नकार पचविण्याची मानसिकता संपत चालली असल्याचे वाकडमधील तरुणीवर झालेल्या जीवघेण्या

- अनिल पवळ, पिंपरी

तंत्रज्ञानाच्या युगात संवाद कमी होत असतानाच युवा पिढीतील नकार पचविण्याची मानसिकता संपत चालली असल्याचे वाकडमधील तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही विकृत मानसिकता शहरातील तरुणींच्या जिवावर बेतू लागल्याने तरुणींनी निर्धोकपणे वावरायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात मल्टिनॅशनल कंपन्या आणि महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या कंपन्यांमधील कर्मचारी प्रामुख्याने युवा वर्ग असल्याचे पाहायला मिळते. या आयटी कंपन्या पंचतारांकित असल्याने येथील वातावरणही मोकळे-ढाकळे आणि मैत्रिपूर्ण असते. आधुनिक मानसिकता आणि उच्च शिक्षण यामुळे येथील तरुणींचा पेहराव आणि राहणीमानही आधुनिकतेकडे झुकणारे असणारे आहे. मात्र, या खुल्या आणि मैत्रिपूर्ण वर्तनामुळे विकृत मानसिकता असणाऱ्या तरुणांकडून चुकीची समजूत करुन घेतली जाते आणि यातून एकतर्फी पे्रमाचा तरुणींच्या ससेमिरा मागे लागतो. तोच शहरातील तरुणींच्या जिवावर बेतल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन पाहायला मिळाले आहे. आकुर्डी येथील एका नामांकित महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योत्स्ना बागुल हिची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यानंतर तळवडे येथील सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारी अंतरा दास, हिंजवडी येथील रसिला ओपी या सर्व तरुणी अशा एकतर्फी प्रेमाच्या विकृतीलाच बळी पडल्या आहेत. अश्विनीवरही अशीच वेळ आली होती. चिखली येथील तरुणीला अशाच एका माथेफिरूने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्याला सामोरे जावे लागले. या प्रकरणात मुलीला त्या तरुणाकडून सहा महिन्यांपासून त्रास दिला जात होता. तिने ही बाब कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी अथवा पोलिसांना सांगणे आवश्यक होते. मात्र, तिने हा त्रास कोणालाच सांगितला नव्हता. तिच्या वडिलांच्या मते, घरातील वातावरण अगदी ‘फ्री’ होते. तिने हा प्रॉब्लेम सांगायला हवा होता. मात्र, समुपदेशकांच्या मते, केवळ मोकळे वातावरण असून चालत नाही; पालकांचा पाल्यांशी किती ‘सुसंवाद’ आहे, पालक त्यांना किती वेळ देतात, यावरून आपल्या अडचणी सांगायच्या की नाही हे मुली ठरवत असतात. सध्याच्या तरुणाईमध्ये ‘इगो’ हा घटक महत्त्वाचा आणि अतिपरिणामकारक ठरत आहे. एखाद्या मुलीने नकार दिला, की या तरुणांचा इगो दुखावला जातो. तो इतक्या थराला जातो, की समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्याइतपत त्यांची मन:स्थिती विकृत होऊन बसते. काही पालकांकडून हवी ती मागणी हवी तेव्हा पाल्यांना पुरविली जाते. ही सवयही अशा विकृतीला खतपाणी घालत असल्याचे मनोविकार तज्ज्ञांचे मत आहे. सध्याच्या मुली मुलांशी फ्रँ कली बोलतात. याचा वेगळाच अर्थ काही तरुणांकडून काढला जातो. शिवाय एखाद्या तरुणीने होकार अथवा नकार देणे हे काही तरुणांसाठी प्रतिष्ठेचे होऊन बसले आहे. त्यांना नकार दिला तर त्यांचा अहंकार दुखावला जातो. आपल्याला नकार देणारी ही कोण, असे म्हणत या विकृतांकडून मुलीला संपवण्याचाच प्रयत्न केला जातो. - आरती बोडरे, तरुणी सध्याच्या युवा पिढीची मानसिकता तयार करण्यात सोशल मीडिया हा घटक महत्त्वाचा ठरत आहे. आपल्या फोटोला लाईक्स मिळत नसतील तर मी कोणालाच आवडत नाही, असा समज या तरुणांकडून करून घेतला जातो. त्यातूनही अशा विकृत मानसिकतेला खतपाणी मिळते. शिवाय मित्रांना गर्लफ्रेंड आहे, पण मला नाही; याचा न्यूनगंड बाळगून तो गर्लफे्रंड शोधू लागतो. अशातच आवडणाऱ्या एखाद्या मुलीने नकार दिला तर तो टोकाचे पाऊल उचलतो. - रणजित सफाले, तरुण बऱ्याचदा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई-वडील दोघेही नोकरी करीत असतात. त्यांच्या पाल्याचा प्रत्येक गोष्टीचा हट्ट पुरविला जातो. येथूनच नकार न पचण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तसेच यातून एकलकोंडेपणाची अवस्था निर्माण होऊन समाजात कसे वावरायचे, एखाद्या घटनेवर कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे, याबाबत अशा पाल्यांच्या मनात गोंधळ निर्माण होत असतो. यातून दुसऱ्याला अथवा स्वत:ला संपवण्यासारखे टोकाचे निर्णय घेतले जातात. याशिवाय आपल्या शिक्षण व्यवस्थेत केवळ पुस्तकी गुणांना किंमत दिली जाते. मात्र अनुभवाच्या जोरावर त्या मुलाचा व्यक्तिमत्त्व विकास कसा घडेल, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. - डॉ. किशोर गुजर, मनोविकृती चिकित्सक घरातील वातावरण मोकळे आहे. आमच्या मुलींना मोकळीक असते, असे केवळ म्हणून चालत नाही. मुलींना आपण किती वेळ देतो, त्यांच्याशी आपला कितपत आणि कसा संवाद आहे, हे महत्त्वाचे असते. शिवाय मुली मॉडर्न राहतात म्हणून त्रास होत आहे. त्यामुळे राहणीमानात बदल कर, असे सुचविणे म्हणजे आपल्या मुलींचे खच्चीकरण करण्याजोगे असते. त्यापेक्षा मुलींशी पालकांचा सुसंवाद असेल, तर मुलीला येणाऱ्या अडचणी तिच्याकडून लगेच समजतील आणि त्यावर मार्ग काढणेही पालकांना सोपे जाऊ शकते.- डॉ. साधना एलकुंचवार, समुपदेशक