शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

आरडाओरड्यामुळे एमआयडीसी परिसर हादरला

By admin | Updated: January 26, 2015 01:34 IST

काही कळण्याचा आत शेडचे लोखंडी छत आणि पाठोपाठ शेजारची भिंत कोसळली.

पिंपरी : बंद कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक काही कळण्याचा आत शेडचे लोखंडी छत आणि पाठोपाठ शेजारची भिंत कोसळली. छत व भिंत कोसळण्याच्या आवाज आणि कामगारांच्या आरडाओरड्यामुळे एमआयडीसी, भोसरी या औद्योगिक क्षेत्रातील शांतता भंगली. एमआयडीसी, भोसरीतील जे ब्लॉकमधील क्रमांक ३२६ या ठिकाणी ही स्मॅश एन्टरप्राईजेस ही कंपनी आहे. क्वॉलिटी सर्कल फोरमच्या कार्यालयापासून ५० मीटर अंतरावर आणि बालाजीनगर झोपडपट्टीला लागून रस्त्याच्या चौकाशेजारी कंपनी आहे. सध्या कंपनी बंद आहे. शेजारी दाल मिल आहे. कंपनीला लागूनच टपरीवजा कॅन्टीन आहे. आजूबाजूला मालवाहू ट्रॅक आणि टेम्पो थांबले होते. रविवार असूनही एमआयडीसीतील शेकडो कंपन्यांमध्ये काम सुरू होते. यंत्रांच्या धडधडीचा आवाज होता.स्मॅश एन्टरप्राईजेस कंपनीतील जुन्या शेड बदलण्याचे काम एका खासगी ठेकेदारामार्फत सुरू होते. ७ ते ८ मजूर काही दिवसांपासून हे काम करीत होते. शेडमधील आतील बाजूस असलेली आधाराची भिंत काढण्यात आली होती. नेहमीप्रमाणे सकाळी नऊला येऊन हे कामगार, मजूर काम करीत होते. अचानक सव्वाबाराच्या सुमारास सिमेंटचे पत्रे, लोखंडी छत सांगाड्यासह खाली आले. त्याच्या वजनाने भिंतीचा काही भागही कोसळला. जुन्या भिंतीच्या ढिगामुळे परिसरात धुरळा पसरला. मोठा आवाज आणि बचावलेल्या कामगारांच्या आरडाओरडा परिसरात घुमला. अचानक झालेल्या या गोंधळ आणि पडझडीमुळे लगतच्या कंपन्यांतील कामगार, कॅन्टीनमध्ये बसलेले मजूर व नागरिक घटनास्थळी धावून गेले. जखमी कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. बचावलेले आणि भेदरलेले कामगार त्वरित बाहेर येऊन रस्त्यावर थांबले. थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. भोसरी व संत तुकारामनगर बंबाच्या गाड्या आल्या. अग्निशामक उपअधिकारी ज्ञानोबा भालेकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी जखमींना सुरक्षितपणे बाजूला काढले. एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.थोड्याच वेळात एमआयडीसी व भोसरी ठाण्याच्या पथकासह पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गस्तीपथक, लांडेवाडी चौकीचे कर्मचारी, उपनिरीक्षक एन. पी. बोचरे, उपनिरीक्षक भुजबळ, हवालदार रामदास जाधव, पी. एम. भवारी, महोदव कवडे, मार्शल रोहिदास सांगडे आदी दाखल झाले. बालाजीनगरातील रहिवासी आणि बघ्यांनी गर्दी केली. त्यामुळे परिसरात गर्दी वाढली. येणारे-जाणारे वाहनचालकही थांबून पाहू लागले. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घातला. बघ्यांना परिसरातून हुसकावून लावण्यात आले. तरीही नागरिक दूर जाऊन थांबत होते. पोलिसांच्या जीपमधूनच जखमींना त्वरित संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतरही बघ्यांची गर्दी परिसरातून हटत नव्हती. हे वृत्त समजताच नागरिक आणि एमआयडीसी भागातील कामगार येथे येत होते. घटना कशी घडली, याची विचारणा करीत होते. पोलीस कर्मचारी सायंकाळपर्यंत तेथे बसून होते. गर्दी वाढताच बघ्यांना हुसकावून लावत होते.(प्रतिनिधी)