शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा मेंढपाळावर मध्यरात्री हल्ला; पुणे जिल्ह्यातील पारगाव तर्फे आळे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 17:55 IST

बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. आप्पा टकले यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत.

ठळक मुद्देबिबट्याने त्यांच्या कान, तोंड व उजव्या बाजूला दाढीकडील भागाला केल्या जखमा परिसराची वनकर्मचारी दत्तात्रय फापाळे, के. एस. नायकोडी व आनंदा गुंजाळ यांनी केली पाहणी

बेल्हा : जुन्नर तालुक्यात आता बिबट्याचा हल्ला झाला नाही, असा दिवस उजाडत नाही. बुधवारी पहाटेच्या सुमारास पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे.याबाबतची माहिती अशी : मेंढपाळ आप्पा केरू टकले (सध्या रा. पारगाव तर्फे आळे) यांनी त्यांची बकरी बाळू उंडे यांच्या कोबीच्या शेतात बसविली होती. त्यांचे कुटुंबीयही शेजारीच असलेल्या त्यांच्या खोपीत झोपले होते, तर आप्पा टकले बकऱ्यांच्या वाड्यात (कळप) झोपले होते. वाड्याच्या जवळच बिबट्याही दबा धरून बसला होता. रात्री १ वाजण्याच्या समारास मेंढ्यांचा ओरडण्याचा व बुजण्याचा आवाज आल्याने आप्पा उठून बसले. ते उभे राहतानाच अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते एकदमच घाबरून गेले. बिबट्याने त्यांच्या कान, तोंड व उजव्या बाजूला दाढीकडील भागाला जखमा केल्या. पांडुरंग डुकरे यांनी वनखात्याला माहिती दिली. त्यांना येथून जवळच असलेल्या प्राथमिक उपचारासाठी आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील खासगी रुग्णालयात वन अधिकाऱ्यांच्या मदतीने दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील वाय. सी. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना २५ टाके पडले आहेत.या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी वनकर्मचारी दत्तात्रय फापाळे, के. एस. नायकोडी व आनंदा गुंजाळ यांनी पाहणी केली. या ठिकाणी लगेचच पिंजरा लावणार असल्याचे फापाळे यांनी सांगितले. या परिसरात ग्रामस्थांना बिबट्या दिवसा व कधी रात्रीच्या वेळी दिसत होता. तसेच पाळीव जनावरांवरही हल्ले करीत होता. लहान मुलेही रस्त्याने जाताना घाबरत होती.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणेjunnarजुन्नर