शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आदर्श वसाहत म्हणून म्हाळुंगे विकसित करू - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:22 IST

म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.

पुणे - म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने म्हाळुंगे ग्राम पंचायत सक्षमीकरण योजनेंतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी वितरण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सरपंच मयूर भांडे उपस्थित होते. या वेळी गिरीश बापट यांच्या हस्ते पाच घंटागाड्या ग्रामपंचायतीला देण्यात आल्या.बापट म्हणाले की, म्हाळुंगेच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. त्याचबरोबर हिंजवडी आयटीपार्कजवळच आहे. यामुळे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारती बांधण्यात येत आहेत. याठिकाणी होणाऱ्या बांधकामावरील शुल्कातून म्हाळुंगे गावाची विविध कामे हाती घ्यावी व यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, म्हाळुंगे गावाच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे आता कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करावी.म्हाळुंगे-नांदे-चांदे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनपीएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत असलेल्या म्हाळुंगे-नांदे-चांदे या रस्त्याच्या कामाचे; तसेच सुधारणेसंबंधी कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. याच भागात हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया रस्त्यावर चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी गिरीश बापट यांनी केली.हिंजवडीआयटी इंडस्ट्रिज असोसिएशन पदाधिकाºयांशी चर्चाहिंजवडी आयटी पार्क परिसरात विविध आयटी कंपन्या कार्यरत आहेत. येथील उद्योजकांना उच्च दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी आयटी इंडस्ट्रिज असोसिएशन आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या नियमित बैठकीमध्ये येथील उद्योजकांना येणाºया अडचणींचे निराकरण करण्यात येते. या बैठकीत आयटी पार्क परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, पोलीस स्टेशन उभारणी, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा, परिसरात काम करणाºयांसाठी चांगल्या दर्जाची वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजविणे इत्यादी कामे त्वरित करण्याबाबत गिरीश बापट यांनी यंत्रणांना निर्देश दिले.घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यामागचा हेतू स्पष्ट करून, म्हाळुंगे गाव व आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी पीएमआरडीए विविध योजना राबविणार आहे.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटnewsबातम्या