शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

भुयारी मार्गामुळे मेट्रो ‘प्लॅन’ बदलणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 23:02 IST

भुयार पाहण्यासाठी गर्दी : मेट्रो स्थानकाच्या कामामध्ये ठरू शकतो अडथळा

लक्ष्मण मोरे / युगंधर ताजणे पुणे : महामेट्रोच्या वतीने स्वारगेट येथे विकसित करण्यात येत असलेल्या ‘मल्टी मोडल हब’च्या जागेमध्ये आढळून आलेल्या भुयारामुळे मूळ आरेखनामध्ये (प्लॅन) बदल करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भुयारांचे नेमके करायचे काय? असा प्रश्न मेट्रोच्या अधिकाऱ्यांपुढे आहे. स्थानकाच्या कामामध्ये या भुयाराचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वारगेट येथील अधिकाऱ्यांनी महामेट्रोकडून अभिप्राय मागविला आहे.

स्वारगेट येथे मल्टी मोडल हबच्या कामादरम्यान पायलिंग मशीनच्या साह्याने खड्डे घेत असतानाच राजर्षी शाहूमहाराज बस स्थानकालगतच्या बाजूची जमीन खचली. गोल खड्डा पडलेल्या जागेमधील माती बाजूला करून खाली उतरून पाहिले असता जमिनीखाली भुयार असल्याचे आढळून आले. बुधवारी दुपारी आढळून आलेल्या भुयाराची माहिती गुरुवारपर्यंत बाहेर आलेली नव्हती. याबाबत मेट्रोकडूनही वाच्यता करण्यात आलेली नव्हती. ही माहिती हाती लागताच ‘लोकमत’ने भुयार सापडल्याची सविस्तरबातमी दिली. महामेट्रोने यासंदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. भुयारातील दगडी भिंतींचे बांधकाम नेमके कसे आहे आणि ते केव्हा करण्यात आले याबाबतची माहिती पालिकेकडे मागण्यात आली आहे. तब्बल ५५ मीटर लांब आणि दीड मीटर रुंद असलेले एक भुयार आहे. त्याला दक्षिण बाजूने आलेल्या पाईपची जोड आहे. काही जण हे ऐतिहासिक भुयार असल्याचे मत मांडत आहेत. तर काही जण स्वारगेट येथील जलतरण तलावासाठी या भुयाराद्वारे शेजारील कालव्यामधून पाणी आणण्यात आल्याचे सांगत आहेत. महापालिकेच्या भवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मेट्रोच्या पत्राला पालिका काय उत्तर देणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी आणि पालिकेच्या अधिकाºयांनी या भुयारांची पाहणी करणे आवश्यक असतानाही दोन्ही विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकलेच नसल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणीपुणेकरांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली होती. येथील अधिकाºयांनी संभाव्य गर्दी लक्षातघेता जास्तीचे जॅकेट्स आणि हेल्मेट्सआणून ठेवले होते. तरुणांपासून ते ६० वर्षीय आजीबार्इंमपर्यंत अनेकांना हे भुयारपाहण्याची इच्छा होती. मात्र, छोट्याशा खड्ड्यामधून जवळपास १५ फूट खाली उतरावे लागत असल्याने मेट्रोच्या अधिकाºयांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना मनाई केली होती. मात्र, तरीही अनेकांनी केवळ खड्डा पाहूनच समाधान मानले.भुयाराचे बांधकाम ऐतिहासिक वाटत नाहीमल्टी मोडल हबच्या कामादरम्यान स्वारगेटला आढळून आलेले भुयार इंग्रजीमधील ‘टी’ आकाराचे असून, ते दुसºया बाजूला बंद आहे. मात्र, हे बांधकाम ऐतिहासिक असेल असे वाटत नाही. भुयाराच्या भिंतीमध्ये स्टीलचा पाईप आढळून आला आहे. येथील जलतरण तलावाला कालव्यामधून पाणीपुरवठा करण्यासाठी ही व्यवस्था उभारली असावी असा अंदाज आहे. याबाबत महापालिकेला पत्र पाठविण्यात आले असून, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करणे अपेक्षित आहे. - डॉ. हेमंत सोनवणे, प्रकल्प सरव्यवस्थापकआॅर्किलॉजिकल सर्वेक्षण होणे गरजेचे; ‘लोकमत’मुळे भुयार कळले : वंदना चव्हाण४सध्या शहरामध्ये अत्यंत गलथान पद्धतीने मेट्रोचे काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारचे भौगोलिक सर्वेक्षण न करता हे काम सुरू आहे.४आज ‘लोकमत’मध्ये आलेल्या भुयारी मार्गाच्याबातमीमुळे आता मेट्रोने काम करण्यापूर्वी शहराचा आॅर्किलॉजिकल सर्वेक्षणदेखील करण्याची गरजअसल्याचे मत व्यक्त केले.तसेच ‘लोकमत’च्या वतीने देण्यात आलेल्या बातमीचे कौतुक करते, की त्यांच्यामुळे पुणेकरांना या पेशवेकालीन भुयारी मार्गाची माहिती मिळाली.‘लोकमत’ने सर्वप्रथम ‘स्वारगेटला सापडले दोन भुयारी मार्ग’ ही बातमी ब्रेक केली आणि त्यानंतर शुक्रवारी दिवसभर पुण्यात या बातमीची चर्चा होती. सोशल मीडिया आणि पुणेकरांच्या तोंडात ‘भुयारी मार्ग सापडला!’ हेच शब्द होते. तसेच हा मार्ग पाहण्यासाठी नागरिकांनी स्वारगेटला मोठी गर्दी केली होती.

 

‘तो’ मार्ग पेशवेकालीन की ब्रिटिशकालीन?पेशव्यांनी कात्रजवरून शनिवारवाड्यात पाणी आणले होते. कदाचित हा भुयारी मार्ग त्यापैकी एक असावा, मस्तानी तलावातील पाणी या भुयारी मार्गातून शनिवारवाड्यापर्यंत येत असावे, संकटकाळात शत्रूपासून बचाव करण्याकरिता भुयारी मार्ग बांधला असावा, राज परिवारातील व्यक्तींना सुखरूप दुसऱ्या जागी नेण्याकरिता भुयारी मार्ग बांधले जायचे,अशा एकापेक्षा एक वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींना आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ कथा-कादंबऱ्यांच्या माध्यमातून वाचलेल्या, सांगोवांगीच्या गप्पातून पुढे आलेल्या ‘भुयारा’च्या गोष्टींच्या चर्चेला उधाण आले आहे.स्वारगेट परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना सापडलेल्या भुयारांचे वृत्त ‘लोकमत’ने प्रथम प्रसिद्ध केले आणि पुणेकरांचे लक्ष त्या भुयाराकडे गेले. मोठी उत्सुकता व कुतूहलपूर्वक त्यांनी भुयार बघण्याकरिता गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. हे भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी हैराण झाले. कारण त्यांना प्रत्येकाला शिडीद्वारे भुयारात उतरावावे लागत होते.

या भुयाराबाबत इतिहास संशोधक व अभ्यासकांना विचारले असता त्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मते व्यक्त केली. यात मंदार लवाटे यांनी तो भुयारी मार्ग ब्रिटिशकालीन असावा असे मत नोंदविले. तर डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरूव पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी शनिवारवाडा व भुयारातील बांधकाम एकसारखे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.भुयारातील बांधकाम ब्रिटिशकालीनभुयारातील दोन्ही बाजूच्या भिंतीची लांबी साधारणपणे ५७ मीटर इतकी आहे. वरचा भाग गोलाकार आकारात वीट व चुन्यात बांधला गेला आहे. जे पाईप भुयारात आढळून आले त्या पाईपचा व्यास १ फूट इतका असून, ते भिंतीत बसविण्यात आले आहेत. त्यावर ब्रिटिशकालीन मार्क आहेत. ज्या विटांच्या मदतीने बांधकाम करण्यात आले आहे त्यांना पुस्तकी विटा असे म्हटले जाते. त्यामुळे भुयारातील हे बांधकाम ब्रिटिशकालीन असावे असे म्हणता येईल. मुख्यत्वे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी पाणी वाहून नेण्याकरिता भुयाराची निर्मिती केली असावी. ते पाणी कुठे नेत असावेत याबद्दल मतमतांतरे असू शकतील. त्याकरिता आणखी संशोधन व अभ्यास करावा लागेल. तूर्तास प्राथमिक पाहणीवरून त्याचा उपयोग भुयाराकरिता करण्यात आल्याचे दिसून आले आहे.- मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक व संशोधकपेशवेकालीन भुयारी मार्गपूर्वी शनिवारवाडा ते पर्वती असा भुयारी मार्ग होता. आता समोर आलेल्या भुयारांच्या माध्यमातून ते पेशवेकालीन असावेत, असे मत मांडावेसे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे शनिवारवाड्याच्या सुरक्षेकरिता वेगवेगळे भुयारी मार्ग तयार केले होते. या भुयारांचे बांधकाम बघितल्यानंतर हा तोच भुयारीमार्ग दिसतो आहे. भुयाराबद्दल आणखी सांगायचे झाल्यास, त्यात दोन्ही बाजूने जागा सोडली आहे. त्यातून घोडेस्वार जाऊ शकतील एवढी ती जागा आहे. कदाचित सुरक्षा व बंदोबस्ताकरिता या भुयाराचा वापर केला जात असावा. अद्यापही त्याचे बांधकाम मजबूत वाटते. पेशवे शनिवारवाड्यात राहण्यास होते. अचानक शत्रूने शनिवारवाड्यावर हल्ला झाल्यास त्यातील व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी अशा पद्धतीचे मार्ग तयार के ले जात.- डॉ. वसंत शिंदे, पुरातत्त्वज्ञ व कुलगुरू डेक्कन अभिमत विद्यापीठ 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रो