जिल्ह्यात मे महिन्यात ५८ हजार ग्राहकांनी स्वतःहून पाठवले मीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:52+5:302021-06-10T04:07:52+5:30

दरमहा चार दिवसांची मुदत : कोरोना प्रादुर्भावामुळे सुविधा उपलब्ध पुणे : वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व ...

Meter readings sent by 58,000 customers in the district in May | जिल्ह्यात मे महिन्यात ५८ हजार ग्राहकांनी स्वतःहून पाठवले मीटर रीडिंग

जिल्ह्यात मे महिन्यात ५८ हजार ग्राहकांनी स्वतःहून पाठवले मीटर रीडिंग

Next

दरमहा चार दिवसांची मुदत : कोरोना प्रादुर्भावामुळे सुविधा उपलब्ध

पुणे : वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील ५८ हजार २८९ ग्राहकांनी मे महिन्यात स्वतःहून वीज मीटर रीडिंग पाठवले आहे, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. महावितरण मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले होते.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टिम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे.

----

स्वतःहून मीटर रीडिंग घेण्याचे फायदे

प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास अनेक फायदे होणार आहेत. स्वतःच्या मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रीडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.

Web Title: Meter readings sent by 58,000 customers in the district in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.